Maharashtra Breaking News Live Updates: मध्यरात्री प्रशांत कोरटकर याच्या छातीत कळ
Saam TV March 28, 2025 07:45 AM
संजयकाका भाजपात जाणार असल्याची चर्चा

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली मध्ये भाजपचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संजयकाका पाटील यांची भेट घेतली आहे. संजयकाका पाटील यांच्या तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील घरी चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील आणि संजयकाका पाटील यांच्या मध्ये भेट झाली, यावेळी संजयकाका पाटील यांची सुपुत्र प्रभाकर पाटील हे देखील उपस्थित होते

Maharashtra Breaking News Live Updates: मध्यरात्री प्रशांत कोरटकर याच्या छातीत कळ

पोलीस चौकशी करत असताना छातीत दुखत असल्याचा कोरटकरची माहिती

पोलिसांनी करून घेतली वैद्यकीय तपासणी

वैद्यकीय तपासणी नंतर चौकशीसाठी इतरत्र हलवलं

कोरटकरने फरार काळात राहिलेल्या ठिकाणची दिलेली माहितीची सत्यता पडताळणीसाठी पोलीस रवाना

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा, धनंजय देशमुख यांची मागणी

काल माझे बंधू संतोष अण्णा देशमुख यांच्या संदर्भाच न्याय प्रविष्ट असणारा प्रकरण त्याची काल सुनावणी झाली आहे. सुनावणी दरम्यान ज्या काही गोष्टी घडल्या जो काही युक्तिवाद झाला त्याच्यामध्ये असं स्पष्ट झाले आहे की जे काही गुन्हेगारी आहे सगळी संघटित गुन्हेगारी आहे आपण पहिल्यापासून म्हणत आहोत हे आरोपी एकच आहेत अपहरण ते खून ही संपूर्ण घटना एकच आहे हे आरोपी एकच आहेत या आरोपींनी अपहरण करून हत्या केली त्या संदर्भात निकम साहेबांनी स्पष्टपणे प्रसार माध्यमांना या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे मला या संदर्भात न बोलता एवढे बोलेल आम्हाला न्याय मिळाला पाहिजे या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि हे संपूर्ण प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालले पाहिजे अशी मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे.

प्रशांत कोरटकरच्या छातीत काल मध्यरात्री कळ; वैद्यकीय तपासणी केली

मध्यरात्री प्रशांत कोरटकर याच्या छातीत कळ

पोलीस चौकशी करत असताना छातीत दुखत असल्याचा कोरटकरची माहिती

पोलिसांनी करून घेतली वैद्यकीय तपासणी

वैद्यकीय तपासणी नंतर चौकशीसाठी इतरत्र हलवलं

कोरटकरने फरार काळात राहिलेल्या ठिकाणची दिलेली माहितीची सत्यता पडताळणीसाठी पोलीस रवाना

कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातच युरियाचा कोट्यावधींचा घोटाळा

- नाशिक जिल्ह्यातून धक्कादायक बातमी

- शेतीसाठीचा ९० टन युरिया गोदरेज ऍग्रोवेट खासगी कंपनीच्या घशात

- पशुखाद्य तयार करण्यासाठी केला जात होता वापर

- हरियाणा आणि कोलकाता परिसरातून आला होता लाखोंचा कृषी अनुदानित युरिया

- 90 मेट्रिक टन युरिया जप्त, कृषी विभागाच्या अहवालानंतर दिंडोरी पोलिसांत गुन्हा

- कंपनी संचालक आणि युरिया पुरवठादार कंपन्या वाहतूकदार अशा सर्व नऊ जणांवर गुन्हे दाखल

आंबादास दानवे यांनी शिवणी आरमाल येथेल् आत्महत्या शेतकरी कुटुंबाला भेट

यावेळी कुटुंबंयाकडून सर्व माहिती जाणून घेतली..

कैलास नागरे यांनी 14 गावाला पाणी द्या या मागणी साठी आत्महत्या केली ..

मात्र अद्याप पर्यंत जिल्हा प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नसल्याने आंबादास दानवे यांनी भेट देऊन तातडीने त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल..

तसेच जिल्हाधिकारी यांनी वरिष्ठाना चुकीची माहिती दिल्या बद्दल नाराजी व्यक्त केली..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यंगचित्राचे पुण्यात होल्डिंग लावणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल..

पुण्यातील अलका चौकात लावलेल्या होर्डिंगवर रिक्षा, गुवाहाटी, दाडी, चष्मा आणि गद्दार या शब्दाला महाराष्ट्रात बंदी आहे का?

अशा आशयाची होर्डिंग काल सकाळी अलका चौकात अज्ञातांनी लावण्यात आले होते..

या होर्डिंगची चर्चा काल दिवसभर शहरात रंगली होती.या नंतर आता पोलिसांनी या होर्डिंग लावणाऱ्या अज्ञाता विरोधात विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात व्हिडिओ व्हाट्सअप ग्रुप वर पोस्ट केल्याने पनवेल मध्ये गुन्हा दाखल.

आम्ही पनवेलकर या व्हाट्सअप ग्रुप वर मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा अर्धवट विडिओ पोस्ट केला ज्यामुळे समाजामध्ये द्वेषची भावना आणि गटातटात दंगा घडू शकतो म्हणून गुन्हा नोंद करण्यात आलाय.

नाखवा अबू बकर आणि एका महिले विरोधात गुन्हा दाखल.

पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

इस्लामपूर मध्ये एका महिलेच्या दारात करणी आणि भानामतीचा प्रकार

सांगलीच्या इस्लामपूर मध्ये एका भागामध्ये महिलेच्या दारात जादूटोणा आणि करणीचा प्रकार केल्याचे निदर्शनास आले आहे. दारात बकर्यांचे मुंडके आणि चार पाय अडकवले होते. हा जादूटोणा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळेत हस्तक्षेप करून कुटुंबियाचे आणि नागरिकांचे प्रबोधन केले. तर पोलिसांच्या उपस्थितीत सर्व साहित्य बाजूला करून त्यांच्यात तयार झालेली भीती दूर करण्यात आली. या घटनेची तक्रार घरातील महिलांनी पोलिसांच्याकडे केली आहे.

राहुरी शहरासह तालुका कडकडीत बंद_महापुरुष पुतळा विटंबना प्रकरणाचे पडसाद -

राहुरी शहरात काल झालेल्या महापुरुषांच्या पुतळा विटंबनेचा निषेध करण्यासाठी आज राहुरी शहरासह तालुक्यात बंदची हाक देण्यात आली आहे.. या बंदला सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि आस्थापना कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहेत

नंदुरबार पालिका नालेसफाई करत नसल्याने गटारीचे पाणी नागरिकांच्या घरात....

नंदुरबार शहरात सध्या घाणीचं साम्राज्य पसरला आहे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पसरले असून गटारींचं पाणी हे रस्त्यावरून वाहत आहेत या सोबतच गटारींचे पाणी हे अनेक नागरिकांच्या घरात शिरत असल्याची परिस्थिती असून वेळोवेळी गटारी साफ न केल्यामुळे नागरिकांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहेत

वाशिम जिल्ह्यात ११४ वीज चोरट्यांवर धडक कारवाई, १ कोटी ४२ लाखाचा दंड वसूल

वाशिम जिल्ह्यात वीज चोरीवर अंकुश ठेवण्यासाठी भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. जानेवारी ते २१ मार्च या कालावधीत तब्बल ११४ वीज चोरट्यांना पकडण्यात आले असून, १ कोटी ४२ लाख ८३ हजार ६६२ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

ट्रॅक्टरवरुन पडून मजुराचा मृत्यू....कारली-आसलपाणी रस्त्यावरील घटना...

ट्रॅक्टर ट्रॉलीचे टायर फुटल्याने भरधाव ट्रॅक्टर अनियंत्रित झाले. त्यावेळी ट्रॅक्टरवरील मजूर रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सदर तुमसर तालुक्यातील कारली आसलपाणी रस्त्यावर घडला. अमर देवनाथ कासवकर (३१) रा. सुरेवाडा (पुनर्वसन) ह. मु. बघेडा ता. तुमसर, असे मृतकाचे नावआहे.

Crime News :3 दिवसांत 5 सोनसाखळ्या हिस्कवल्याच्या

छत्रपती संभाजीनगर शहरात रस्त्यावरून चालणाऱ्या महिलांच्या 3 दिवसांत 5 सोनसाखळ्या हिस्कवल्याच्या घटना घडल्यात. तर शंभूनगरमध्ये कोयत्याने हल्ला करीत लुटीचाही प्रयत्न झाल्यानं शहरात दहशतीचे वातावरण आहे. शहरात सोनसाखळी आणि मोबाईल हिसकावण्याच्या घटनांचा सिलसिला अद्यापही थांबलेला नाही. गेल्या 3 दिवसांत 2 महिला आणि 3 पुरुषांना चोरट्यांनी लक्ष्य केले. या घटनांमध्ये दोन मोबाईल आणि दोन सोनसाखळ्या लंपास करण्यात आल्या. सचिन गायकवाड हे 23 मार्चला रात्री परिसरातून जाताना, सराईत गुन्हेगार विशाल कसबे हा नागरिकांच्या अंगावर कोयता फिरविण्याचा प्रयत्न करीत होता. त्याने सचिन यांचा मोबाईल हिसकावला. सचिन यांनी प्रतिकार केला असता, विशालने त्यांच्या बरगडीवर कोयत्याने वार केला. स्थानिकांनी त्याला पकडून जवाहरनगर पोलिसांच्या हवाली केले. उपनिरीक्षक प्रशांत मुंडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला.

Maharashtra Breaking News Live Updates: प्रशांत कोरटकरची पोलिसांकडून सहा तास झाली कसून चौकशी

फॉरेन्सिक लॅब कडून प्रशांत कोरटकर वर प्रश्नांचा भडिमार

इंद्रजीत सावंत यांना आपणच कॉल केल्याची प्रशांत कोरटकर ची कबुली - सूत्रांची माहिती

प्रशांत कोरटकर याने मोबाईल मधील डाटा स्वतः डिलीट केल्याची कबुली - सूत्रांची माहिती

रायगडच्या जिल्हा रूग्णालयातील रूग्णालयातील फिल्टरमध्ये आढळल्या अळ्या आणि माती

अलिबाग येथील रायगड जिल्हा रुग्णालयातील पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरमध्ये माती आणि अळ्या आढळून आल्या असून पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या पाण्याला विशिष्ट प्रकारचा वास येत असल्याची तक्रार रूग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. हे पाणी प्यायल्यास उलट्या, जुलाबाची बाधा होऊ शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. पिण्याच्या पाण्याबाबतच्या या महत्वपूर्ण तक्रारीकडे कर्मचारी कानाडोळा करत असल्याचा आरोप देखील केला जात आहे.

Dharashiv : केवळ ३४ टक्के पाणीसाठा ; वाढत्या उन्हामुळे पाण्याचा वापर वाढला

धाराशिव जिल्ह्यात मार्च मध्ये उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत.त्यामुळे पिकांना देखील अधिक पाणी लागत असल्याने पाणी उपसा वाढला आहे तर बाष्पीभवनामुळे देखील प्रकल्पातील पाणी साठा देखील कमी होत आहे.जिल्ह्यातील प्रकल्पात एकुण ३४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.जिल्ह्यातील २२६ प्रकल्पांपैकी केवळ एक प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला आहे तर ३ प्रकल्पात ७५ टक्के च्या वर पाणीसाठा आहे ३९ प्रकल्पात ५१ ते ७५ टक्के,८४ प्रकल्पात २६ ते ५० टक्के,५४ प्रकल्पात २५ टक्के पेक्षा कमी,४३ प्रकल्प जोत्याखाली तर एका प्रकल्पाने तळ गाठला आहे एकुण प्रकल्पात २४९.९३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. दरम्यान आगामी काळात पाण्याचा जपुन वापर न केल्यास टंचाई निर्माण होवु शकते त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करा अस आवाहन प्रशासनाने केले आहे.

Agro : टॉमेटोचे दर गडगडल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

भंडारा हा तसा भात उत्पादक जिल्हा....मात्र, पारंपरिक भातपिक उत्पादक शेतकरी आता नगदी पीक म्हणून बागायती शेतीकडं वळलेत. मात्र, सध्या हे बागायची शेतकरी आर्थिक संकटात अडकले आहेत. बागायती शेतीत टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. मात्र, बाजारात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढल्यानं त्याचे दर कोलमडलेत. एका कॅरेटमध्ये २५ ते ३० किलो टोमॅटो भरल्या जातात. मात्र, या कॅरेटला भंडारा जिल्ह्यात केवळ २० ते २५ रुपये दर मिळत आहेत. एक कॅरेट टोमॅटो लागवड ते बाजारात विक्रीपर्यंत सुमारे ९० रुपयांचा खर्च शेतकऱ्याला येतो. या एक कॅरेट टोमॅटोला केवळ २५ रुपयेपर्यंत दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना ६५ रुपये तोटा सहन करावा लागत आहे. धानाला ज्याप्रमाणे राज्य सरकार हमीभाव देतो, त्याप्रमाणे बागायती शेतीच्या मालालाही तशाच प्रकारे हमीभाव दिल्यास शेतकऱ्याची आर्थिक स्थिती उंचावेल, अशी अपेक्षा आता शेतकरी बाळगत आहेत.

nashik-manmd-कांदा बियाण्यांवर मधमाशांच्या अभावामुळे परागीकरण होत नाही.

नाशिक जिल्ह्यात कांदा मोठ्या प्रमाणात पिकवला जातो,अनेक शेतकरी आपल्या शेतात जानेवारी,फेब्रुवारी नंतर कांदा बियाणे (डोगंळे) लागवड करीत असतात,सध्या अनेक शेतक-यांनी डोंगळ्यांची लागवड केलीय त्याला पांढरी फुल लागलीय मात्र मधमाशांच्या अभावी परागीकरण फारसे होत नसल्याच दिसून आलय.त्यातच तीव्र उन्हाचा फटका बसत असल्याने कांदा बियाण्याच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होत असल्याच पहावयास मिळत असून त्याचा फटका मात्र कांदा उत्पादक शेतक-यांना बसणार आहे.

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी 6 लाख 50 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने अर्पण

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी चरणी सुमारे साडे सहा लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत. ठाणे येथील भाविक राकेश परशुराम दलाल व रुपेश परशुराम दलाल यांनी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ विठ्ठल रुक्मिणीला सोन्याचा चार पदरी हार पदकासह व ठुशी असे सुमारे 73.950 ग्रॅम वजनाचे दागिने अर्पण केलेले आहेत. त्यांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी 6 लाख 50 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने अर्पण

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी चरणी सुमारे साडे सहा लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत. ठाणे येथील भाविक राकेश परशुराम दलाल व रुपेश परशुराम दलाल यांनी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ विठ्ठल रुक्मिणीला सोन्याचा चार पदरी हार पदकासह व ठुशी असे सुमारे 73.950 ग्रॅम वजनाचे दागिने अर्पण केलेले आहेत.

Hapus : अवकाळी पावसामुळे हापूस आंबा अडचणीत

कोकणची अर्थव्यवस्था अवलंबून असणारं आंबा पिक सध्या अवकाळी पावसामुळे अडचणीत आलय. कोकणात पडलेल्या अवकाळी पावसाचा परिणाम इथल्या आंबा पिकावर होण्याची शक्यता निर्माण झाल्याने आंबा बागायतदार चिंता ग्रस्त झालाय. यंदा हापूस आंबा पिक उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणात घट झालीय. केवळ 25 ते 30 टक्के उत्पादन हाती येण्याची शक्यता आहे . उत्पादन कमी त्यात अवकाळी पाऊस यामुळे आंबा बागातदार मेटाकुटीला आलाय. गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलाचा सामना हा आंबा बागायतगारांना करावा लागतो.अवकाळी पावसामुळे नेमका आंबा पिकावर कशा पद्धतीने परिणाम होईल.

Nagpur Clash : नागपूर हिंसाचार प्रकरणातील बहुचर्चित आरोपी मोहम्मद हमीद इंजिनिअर जामीनासाठी कोर्टात

- 69 वर्षीय हमीद इंजिनिअरने जामीन मिळवण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे

- हमीद इंजिनियर हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष आहे

- सोशल मीडियावर अक्षयपार्य पोस्ट टाकून धार्मिक हिंसाचाऱ्याला चितावणी दिला त्या हमीद इंजिनिअरवर आरोप आहे

- इंजिनीयर कायद्याचे पालन करणारा नागरिक असून राजकीय दबावामुळे या गुन्हामध्ये फसवण्यात आल्याचा दावा जामीन अर्जात करण्यात आला आहे

- तेच घटनेचा मास्टरमाईंड असण्याचा आरोप असलेला फिल्म खान यांनी जामीन याचा अर्ज केला आहे.₹ त्याच्यावर 1 एप्रिल रोजी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Nagpur News : नागपुरातील हिंसाचार आणि दगडफेकीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण

- सरकारी नियमानुसार 7 लाख 20 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे

- ही मदत येत्या दोन दिवसात मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे

- दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयाला 5 लाखांची मदत मिळावी असा प्रस्ताव प्रशासनाकडून राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे

- नागपूर हिंसाचारात इरफान अन्सारी नावाच्या 40 वर्षीय व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता..

- नागपुरातील दंगलीत 61 वाहनांचे नुकसान झाले, यात एका घराचे अंशतः नुकसान झाले आहे.

- 22 दुचाकी, 36 चारचाकी, 2 ऑटोरिक्षा, 2 क्रेनचे नुकसान झाले आहे.

- लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, मात्र शासन निर्णयानुसारच नुकसान भरपाई दिली जाते.

उल्हासनगरमध्ये पाण्यासाठी आमरण उपोषण

उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील मराठा सेक्शन विभागात मागील अनेक महिन्यांपासून पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.अनियमित पाणी पुरवठा ,ब्ल्यू लाईन चं पाणी येत नसल्या कारणांने,तसेच बारवी चं पाणी चोरीला गेल्याचं म्हणणं नागरिकांचं आहे,याविषयी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत उल्हासनगर महापालिकेच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याने अखेर समाजसेवक राजेश चांनपूर यांच्यासह रहिवाशांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करलाय. समाजसेवक राजेश चांनपुर यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला सुरुवात करण्यात आलीय. जोपर्यंत येथील पाणी समस्या कायमस्वरूपी सुटत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूचं ठेवणार असल्याचं राजेश चांनपूर यांनी सांगितले आहे,

बाळापूर जवळ लक्झरी आणि टेम्पोचा अपघात.

अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर जवळ लक्झरी आणि टेम्पोचा अपघात झालाय.. मुंबईकडे जाणारी लक्झरी हायवे वरील स्मिला हॉटेल जवळ डिव्हायडर तोडून अकोला कडे येणाऱ्या टेम्पोवर जाऊन आदळली...यामध्ये टेम्पोचा ड्रायव्हर आणि क्लीनर हे दोघे जखमी झाले.. जखमींना अकोल्याचे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हा अपघात इतका भीषण होता की अक्षरशः अपघातात टेम्पोचा चुराडा होत मोठे नुकसान झाले आहे.. या अपघातामुळे लक्झरीमध्ये बसलेले प्रवासी घाबरले आहेत....अकोला वरून पुण्याला जाणारी राजहंस लक्झरी बस होती.... रात्री उशिरा ही अपघाताची घटना घडली आहे..

RailwayNews गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मध्य रेल्वे विभागाने काही महत्वाचे निर्णय घेतले. मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्यांना एलएचबी कोच लावण्याचा निर्णय घेतला आहे. तर सुधारित संरचनेसह गाडी चालवण्यात येणारेये. महाराष्ट्र एक्सप्रेसला एलएचबी कोच लावले जाणार असल्याने प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे.. तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता काही विशेष ट्रेनच्या परिचालन कालावधीमध्ये वाढ करण्यात आलीये.. ज्यामध्ये बलसाड-दानापूर साप्ताहिक विशेष गाडी ही 23 जून पर्यत असणारेये.. तर दानापूर – बलसाड साप्ताहिक विशेष गाडी 1 जुलैपर्यंत, उधना – पटना साप्ताहिक विशेष गाडी 27 जूनपर्यंत, पटना – उधना साप्ताहिक विशेष गाडी 28 जूनपर्यंत, राजकोट – मेहबूबनगर साप्ताहिक विशेष 30 जूनपर्यंत, मेहबूबनगर – राजकोट साप्ताहिक विशेष 1 जुलैपर्यंत, रिवा –बांद्रा टर्मिनस अनारक्षित साप्ताहिक विशेष 27 जूनपर्यंत आणि टर्मिनस – रिवा अनारक्षित साप्ताहिक विशेष 26 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या या विशेष गाड्यांना मुदतवाढ दिल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाये. या गाडीसाठी लागू असलेल्या अनारक्षित शुल्कासह अनारक्षित कोचसाठी तिकिटे यूटीएस ॲपद्वारे बुक वापरता येणार असल्याचे रेल्वे विभागाने कळवले.

Nandurbar : पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी नंदुरबार मध्ये एका अनोख्या बॅनर ची चर्चा

नंदुरबार जिल्ह्यात तापमानात सातत्याने वाढ होत असून सातपुड्याचा अनेक भागात पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून यामुळे मोठी पाणीटंचाई निर्माण झाली आहे यासाठी जिल्हा प्रशासन नियोजन करत असून नंदुरबार शहरातील जलसंपदा विभागाचा कार्यालयासमोर लावलेल्या एका बॅनर्जी चांगलीच चर्चा रंगली आहे आपण आज ज्याप्रमाणे पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल घेतोय यात पद्धतीने येणाऱ्या काळात आपल्याला पाणी पंप तयार करावा लागेल आणि भविष्यात पेट्रोल प्रमाणे पाण्याचे पंप तयार करून त्या ठिकाणाहून विकत पाणी घेण्याची वेळ येऊ शकते यासाठीच सर्वांनी प्रयत्न करत पाण्याचा अपव्यव टाळून पाणी जपून वापरण्याचा अनोखा संदेश या बॅनरचा माध्यमातून देण्यात आलेला आहे...

JALNA : जालन्यात समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणारे वाहन पोलिसांनी पकडले...

जालन्यात समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणारे वाहन पोलिसांनी पकडले आहे. जालना महामार्ग पोलिसांनी ही कारवाई केलीय. जालना हद्दीतील समृद्धी महामार्गवर तांदुळवाडी शिवारात पोलिसांनी हि कारवाई केली असून कारवाईत 5 लाख 32 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. दरम्यान अंधाराचा फायदा घेऊन कार मधील चार आरोपींनी कार रस्त्यावर सोडून देत पळ काढला आहे.दरम्यान या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात 4 अज्ञात डिझेल चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Buldhana : वाहनाच्या धडकेतत हरीण गंभीर जखमी

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा ते जळगाव जामोद या मार्गावर् अज्ञात वाहनाने एका हरणीला जबर धडक दिली यामध्ये हरीनीचे दोन्ही पाय निकामी झाली. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी हरिनाला उचलून बाजूला नेऊन पाणी पाजले तिला जीवदान दिले त्यानंतर शिवाजी पेसोडे यांनी याबाबतची माहिती परिसरातील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. काही वेळानंतर अधिकारी पोहोचल्यानंतर सदर हरिनाला रुग्णालयात हलविण्यात आले.

malegaon-धुळीमुळे नागरिक त्रस्त

नाशिकच्या मालेगाव मालेगाव मधील नागरीक सध्या धुळीच्या विळख्यात सापडले आहे.शहरात रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून मलनिस्सारण व इतर विकास कामांमुळे रस्ते उडलेले असून रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्यातून उडणारी धुळ यामुळे नागरिकांना श्वासाना बरोबर सर्दी,खोकल्याच्या आजारामुळे नागरीक त्रस्त झाले असून महापालिकेने तातडीने रस्त्यांची काम पुर्ण करावी अशी मागणी होत आहे.

Pune News : रेल्वे स्थानकात फलाटांवर गैरसोय.

उन्हाच्या तीव्र झळा, प्रवाशांची गर्दी, अपुरी आसन व्यवस्था, प्रतीक्षाकक्षात गर्दी, त्यामुळे स्थानकातील फरशीवर रेल्वेच्या प्रतीक्षेत बसलेले प्रवासी, बंद पडलेले शौचालय, बंद असलेली बॅटरीवरची वाहने, सुरू न झालेली उद्वाहन सुविधा आणि त्यामुळे त्रस्त प्रवासी... पुणे रेल्वे स्थानकात सध्या असे चित्र दिसत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा काळ सुरू होत असल्याने रेल्वे गाड्यांना गर्दी वाढत असताना, त्यात स्थानकावर प्रवाशांना अशा असुविधांचा सामना करावा लागतो आहे.

Pune News : दोन लाख मुलांना मेंदूज्वराची लस..

राज्यात पुणे, रायगड, परभणी या तीन जिल्ह्यांत आणि पुणे, पनवेल, परभणी, पिंपरी-चिंचवड या चार महापालिकांमध्ये जपानी मेंदूज्वर लसीकरण मोहीम १ मार्चपासून सुरू झाली. या मोहिमेंतर्गत पुणे शहरातील १ ते १५ वर्षे वयोगटातील एकूण १० लाख ४३ हजार ४२० मुला-मुलींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालय स्तरावर अंमलबजावणी व अहवाल सादरीकरण कक्ष आहेत. सर्व परिमंडळ व क्षेत्रीय वैद्याकीय अधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील समन्वयक अधिकारी म्हणून काम करीत आहेत.

Pune : पुणे, पिंपरीचिंचवडमधील १८ प्रकल्पांना उत्पादन बंद करण्याचे निर्देश...

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात हवा प्रदूषणात वाढ झाल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांच्या विरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत २४ प्रकल्पांना नोटीस बजाविण्यात आली असून, १८ प्रकल्पांना उत्पादन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकाम प्रकल्पांसाठी रेडी मिक्स काँक्रीटचा पुरवठा करणारे शेकडो प्रकल्प कार्यरत आहेत. या प्रकल्पांमुळे हवा प्रदूषणात वाढ होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. वाकड परिसरात आरएमसी प्रकल्पांमुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तेथील रहिवाशांनी मोर्चा काढला होता. याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर मंडळाने या प्रकल्पांच्या विरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

Pune News : गाव नकाशा आता मिळणार संकेतस्थळावर...

भूमी अभिलेख विभागाने सर्वे नंबर निहाय गाव नकाशा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिला आहे.

या सुविधेमुळे संबंधित गावांमध्ये जमीन कुठे आहे जमिनीच्या चतुरसीमा आजूबाजूची गट नंबर आणि मालक कोण आहे याची माहिती घरबसल्या क्लिकवर मिळत आहे..

सर्वेनंबर निहाय गावाचा नकाशा आता महाभुमी या संकेतस्थळावर उपलब्ध झाला आहे...

पुण्याच्या वाहतूक कोंडीची केंद्राने घेतली दखल...

केंद्रशासन करणारा वाहतूक आराखडा...

राज्यातील मोठ्या शहरांमधील अवजड वाहतुकीमुळे होणारी वाहतूक कोंडी तसेच रस्त्या अपघाताची दखल घेत वाहतूक कोंडी फोडण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेतला आहे...

त्या अंतर्गत राज्यातील सहा शहरांची निवड करण्यात आली असून त्यात पुणे पहिल्या क्रमांकावर आहे...

पुण्यासह राज्यातील नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नाशिक,नागपूर या शहराचा यात समावेश आहे.

Pune Live : मिळकतकरातून २,२२९ कोटींचे उत्पन्न..

महापालिकेच्या कर आकारणी आणि करसंकलन विभागाला चालू आर्थिक वर्षात (२०२४-२५) मिळकतकरातून २ हजार २२९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये समाविष्ट गावांमधून ४१४.०९ कोटींचे उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले असून, मंगळवारी (२५ मार्च) एकाच दिवशी सर्वाधिक १३ कोटी २० लाख रुपयांचा मिळकतकर जमा झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

Maharashtra Breaking News Live Updates: दत्ता गाडे याला ८ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी

स्वारगेट एस टी स्टँड मध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडे

न्यायालयीन कोठडी संपत असल्यामुळे गाडे याला न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे हजर करण्यात आलं होतं

न्यायालयाने त्याला ८ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.