केवळ भाषा म्हणूनच नव्हे, तर साहित्य, संस्कृती आणि परंपरेचादेखील समृद्ध वारसा लाभलेल्या मायमराठीला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा मराठी लोकांसाठी अभिमानाचा विषय आहे. त्यामुळे सकाळ समुहाच्यावतीनं अभिजात दर्जा मिळण्यासाठी लढणाऱ्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
सामाजिक, राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात मायमराठीसह विविध सेवाव्रतींचा सन्मानपू्र्वक गौरव करण्यात आला.
डॉ. सय्यद अबरार, वैद्यकीय सेवा
निलम गोरे - सामाजिक सेवा
कुमुदिनी इंगळे सामाजिक सेवा
विक्रांत पाटील - (आमदार) सामाजिक सेवा
डॉ. राहुल गेठे - प्रशासकीय सेवा (अतिरिक्त आयुक्त नवी मुंबई पालिका)
अनिकेत म्हात्रे - युवा नेता सामाजिक सेवा
प्रियंका दामले - सामाजिक सेवा
पवन चांडक (उपविभागीय अधिकारी पनवेल) प्रशासकीय सेवा
मारुती गायकवाड - (मुख्य कार्यकारी अधिकारी, बदलापूर) प्रशासकीय सेवा
प्रशांत रसाळ (अतिर्कत आयुक्त पनवेल) प्रशासकीय सेवा
ब्राईटमेन रिअॅलिटी - सार्थक मिश्रा आणि प्रफुल्ल पटेल - उद्योजक
मनीष भतीजा (विकसक उद्योजक)
सोमनाथ केकाटम (उत्कृष्ट नगररचनाकार)
किशोर पाटकर (जिल्हाप्रमुख शिवसेना) (सामाजिक सेवा)
अपोलो हॉस्पिटल (वैद्यकीय सेवा)
या सर्वांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. मायमराठीची सेवा करणाऱ्या, तिचा प्रचार-प्रसार करणाऱ्या, तिला जनमानसात रुजवणाऱ्या आणि अभिजात दर्जा मिळण्यासाठी लढणाऱ्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यासाठी 'सकाळ'ने पुढाकार घेतला.