महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात आला. मराठी भाषा आणि भाषेला अभिजात दर्जा मिळवणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सकाळ समुहाकडून गौरव करण्यात आला.
या सोहळ्यात मनोरंजन श्रेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनेक सिनेकलाकारांचीही दखल घेण्यात आली. त्याच्या कामाची दखल घेत सकाळ समुहाकडून अनेक कलाकारांचा गौरव करण्यात आला.
बोमन इराणी - मनोरंजन
कार्तिक आर्यन - बेस्ट अॅक्टर
तम्मना भाटिया - एंटरटेनर ऑफ द इयर
नितीन प्रकाश वैद्य - मनोरंजन
भिमराव पांचाळे - गजल
यावेळी वैदेही परशुरामी, प्रियदर्शिनी इंदलकर, शुभंकर तावडे, यांनी आपले नृताविष्कार दाखवत प्रेक्षकांचं मनोरंजन सुद्धा केलं. तसंच या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.