,मायमराठीला मिळालेल्या अभिजात भाषेच्या गौरवार्थ आणि 'सकाळ'च्या 54 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ अभियानांतर्गत 'सकाळ सन्मान' सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला.
यावेळी अनेक सामाजिक सेवक, उद्योजक, व्यावसायिक कलाकारांचा सन्मान करण्यात आला. याबरोबर कार्तिक आर्यन, तमन्ना भाटिया, बोमन इराणी यांचा देखील गौरव करण्यात आला.
मराठी भाषेचा प्रचार, प्रसार करणाऱ्या सांस्कृतिक, मनोरंजन, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सकाळ समुहाच्यावतीनं गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्य उपस्थिती होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनेक उद्योजकांचा सन्मान करण्यात आलाय.
सकाळ समुहातर्फे मराठीची सेवा करणाऱ्या, तिचा प्रचार-प्रसार करणाऱ्या, जनमानसात मराठी भाषा रुजवणाऱ्यांसाठी आणि अभिजात दर्जा मिळवणाऱ्यांसाठी सकाळने पुढाकार घेतला.
सोहळ्यात अभिनेत्री वैदेही परशुरामी, प्रियदर्शिनी इंदलकर, शुभंकर तावडे, नृत्यदिग्दर्शक आशीष पाटील यांनी आपल्या नृत्याविष्काराने चारचांद लावले.