Beed: बीडमध्ये चाललंय काय? महिलेने अंगावर ओतलं डिझेल, अन्...; पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
Saam TV March 21, 2025 03:45 AM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड प्रामुख्याने गुंडगिरीचा हॉटस्पॉट बनला. देशमुख हत्या प्रकरणानंतर अनेक गुन्हेगाराच्या घटना घडल्या. बीडमधून आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेनं पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. अंगावर डिझेल ओतून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. पण त्या महिलेनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? नेमकं कारण काय? पाहा.

नेमकं प्रकरण काय?

बीडच्या एका गावात एका अल्पवयीन मुलीला पळवून नेले. लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर मुलीच्या आईने अंबाजोगाई ग्रामिण पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, त्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल न करता युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला पालकांना पोलिसांनी दिला.

अल्पवयीन मुलीच्या पालकांनी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. एक महिना उलटला. तरी देखील अल्पवयीन मुलगी सापडली नसल्यामुळे मुलीच्या आईला संताप अनावर झाला. संतप्त झालेल्या महिलेने पोलीस ठाण्याबाहेर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

आत्मदहनाचा प्रयत्न करत असताना धाव घेतली. महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून, पुढील प्रक्रिया केली जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.