Baba Wanga : जग दोन गटात विभागणार, एकीकडे मुस्लिम देश तर दुसरीकडे… बाबा वेंगाच्या महाभयंकर भविष्यवाणीने जग चिंताक्रांत
GH News March 22, 2025 04:10 PM

भविष्यवाणी नेहमीच लोकांना आश्चर्यचकित करतात. अनेक लोक सहसा त्यांच्या भविष्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. तथापि, महान भविष्यवक्त्यांनी या जगाबद्दल वेगवेगळी भविष्यवाणी केली आहे. आता 2025 या वर्षाबाबत बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेचा विषय बनली आहे. बाबा वेंगा यांनी 9/11 च्या हल्ल्याची भविष्यवाणी केली होती आणि सोव्हिएत युनियन तुटण्याचीही भविष्यवाणी केली होती. अशा परिस्थितीत त्यांनी 20205 सालासाठी व्यक्त केलेला अंदाज लोकांमध्ये चर्चेत आहे.

बाबा वेंगा या प्रसिद्ध बल्गेरियन भविष्यवक्त्या होत्या. त्यांचे अंदाज अत्यंत अचूक मानले गेले. त्यांनने आपल्या आयुष्यात अनेक भाकिते केली, त्यातील अनेक खऱ्या ठरल्या. त्यांनी कोरोना सारख्या साथीची भविष्यवाणी देखील केली होती.

2025 साठी भविष्यवाणी काय ?

2025 सालासाठी बाबा वेंगा यांनी भाकित केलं होतं, त्यानुसार, युरोपमधील एका शहरात मुस्लिम राजवट प्रस्थापित होईल. आता हा अंदाज खरा ठरताना दिसत असून, त्यामुळेच पुन्हा एकदा बाबा वेंगा यांचे भाकीत चर्चेत आले आहे. बाबा वेंगाच्या भाकितानुसार, युरोपातील जर्मनी शहरात इराणची मुस्लिम राजवट प्रस्थापित होईल. सध्याची परिस्थिती पाहिली तर सध्या जर्मनीत सुमारे पाच टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे आणि ती झपाट्याने वाढत आहे. त्याचवेळी जर्मनीत मुस्लिम शासक अयातुल्ला खोमेनी यांची सत्ताही सुरू होऊ शकते. ही व्यवस्था केवळ युरोपपुरती मर्यादित राहणार नाही, तर अमेरिकेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. बाबा वेंगाच्या भाकितानुसार, जेव्हा संपूर्ण जर्मनीमध्ये मुस्लिम राजवट आपली सत्ता स्थापन करेल, तेव्हा अमेरिकेलाही अडचणींचा सामना करावा लागेल, ज्यामुळे जगातील परिस्थिती आणखी बिघडू शकते.

सर्वांसाठी चिंताजनक भाकीत

बाबा वेंगा यांनी अनेक मोठी भाकितं केली होती. त्यांचा जन्म 31 जानेवारी 1911 रोजी बल्गेरियात झाला, तर 11 ऑगस्ट 1996 रोजी त्यांचे निधन झाले. बाबा वेंगा यांची अपघातात दृष्टी गेली. त्यांची अनेक भाकीतं खरी ठरली आहेत. बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याचे भाकीतही त्यांनी केले होते, जे खरे ठरले. याशिवाय, 2004 साली आलेल्या त्सुनामी आणि जपानच्या भूकंपासंदर्भातही त्यांनी भविष्यवाणी केली होती. 2025 च्या सुरुवातीला जपानमध्ये मोठा भूकंप झाला होता, जो त्यांच्या भविष्यावाणीबद्दल विचार करण्यास भाग पाडतो. बाबा वेंगा यांनीही सोव्हिएत युनियनच्या पतनाचे अचूक भाकीत केले होते. जर आपण त्यांच्या काही भाकितांबद्दल विचार केला तर बाबा वेंगांच्या भाकितानुसार, तिसरे महायुद्ध होऊ शकते. जर्मनीत मुस्लिम राजवट प्रस्थापित झाल्यावर तिसरे महायुद्ध होईल, असा त्यांचा विश्वास होता. या युद्धात भारत, फ्रान्स, ब्रिटन, रशिया आणि अमेरिका एका बाजूला असतील, तर मुस्लिम देश दुसऱ्या बाजूला एकजुटीने उभे राहतील असेही त्यांनी म्हटलं होतं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.