Iceland Minister : तरुणाशी अनैतिक संबंध, मुलाला दिला जन्म; महिला मंत्रीचं पदही गेलं
Saam TV March 23, 2025 03:45 AM

आईसलंडच्या मंत्री आस्थिल्दूर लोआ थोरसडॉटिर यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तरुणाशी अनैतिक संबंध ठेवल्याने आयसलंडच्या मंत्र्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. महिला मंत्र्यांनी तरुणाचं वय १५ असताना त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. तरुण १६ वर्षांचा झाल्यानंतर मंत्री गरोदर झाली. मंत्र्याने एका मुलालाही जन्म दिला.

३६ वर्षांपूर्वीची ही घटना आहे. मंत्री आस्थिल्दूर लोआ थोरसडॉटिर या २२ वर्षांच्या असताना एका तरुणाशी शारीरिक संबंध ठेवले होते. आस्थिल्दूर यांनी २३ वर्षांपूर्वी एका मुलाला दिला होता. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा मंत्री आस्थिल्दूर यांनी दिला. त्यानंतर मंत्री आस्थिल्दूर यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

मीडिया रिपोर्टनुसार, मंत्री आस्थिल्दूर यांचे एरिकूर नावाच्या अनैतिक संबंध होते. एरिकूरने त्याचा मुलाला भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, आस्थिल्दूर यांनी मुलाला भेटण्यास नकार दिला. मंत्री आस्थिल्दूर या मुलाला जन्म देताना एरिकूर रुग्णालयात उपस्थित होता. मंत्री आस्थिल्दूर आणि एरिकूरच्या नात्यात कटुता आली. दोघांनी एकमेकांंशी बोलणे सोडून दिले.

मंत्री आस्थिल्दूर यांनी एरिकूरचे आरोप फेटाळून लावले आहेत. मंत्री आस्थिल्दूर पुढे म्हणाल्या, 'आता मी आधीसारखी राहिली नाही. मी आता गोष्टी वेगळ्या दृष्टीकोनातून पाहते. आधीच वेळ असती तर मी वेगळ्या पद्धतीने परिस्थिती हाताळली असती. पण आता बराच वेळ निघून गेला आहे'.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.