Chief Minister Devendra Fadnavis and Mr. Perfectionist : ‘’फार्मर्स कपच्या मंचावर उपस्थितीत असल्याचा मला आनंद आहे. पानी फाउंडेशनची वाटचाल मी बघतोय. आमिर यांना परफेक्शनिस्ट म्हणतात, त्यांना प्रत्येक क्षेत्रात परफेक्शन येत नाही तोपर्यंत ते थांबत नाहीत. आज आमिर खान तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जात आहात यासाठी तुमचे अभिनंदन.’’ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुण्यात पानी फाउंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना सांगतिले.
मुख्यमंत्री फडणवीस() म्हणाले, ‘’मी सुरुवातील सांगितलं होतं की ५२ टक्के महाराष्ट्र असा आहे, जिथे पाऊस कमी पडतो, तिथे जल संवाधारणातून आपण परिवर्तन करू शकतो. महाराष्ट्रात २० हजार गावांना जल परिपूर्ण केलं. गट शेतीचे आंदोलन महाराष्ट्रात सुरू झाले आहे याची एक नवी निती आणू. सुरुवातीला कृषी समृद्धी योजनेत जी गावं नव्हती ते आता मागे लागले आहेत की आम्हाला घ्या.’’
तसेच ‘’१० ते १५ हजार कोटी रुपये आम्ही शेतीत घालतो, पीक कमी आलं, पाऊस कमी झाला तिथे देतो पण गुंतवणूक केली जात नाही. शेतीतील गुंतवणूक वाढली पाहिजे, तर शेतकरी अधिक सक्षम होऊ शकेल. गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आयुष्यात परिवर्तन करू शकतो.’’ असंही फडणवीसांनी सांगितलं.
तर ‘’जे शेतकरी मागणार त्यांना सौरकृषी पंप देणार आहोत. शेतकऱ्यांना मिळणारी वीज २०२६ पर्यंत कृषी फिडर सोलारवर होणार. सरकारने खूप योजना सुरू केल्या आहेत. आता अँग्री स्टॅक मध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचे डिजिटलाइशन केलं जाणार आहे. तसेच पाण्याचा वापर सुद्धा आवश्यक तेवढाच केला जाईल यावर आम्ही विचार करतोय. अजित दादांनी ५०० कोटी रुपये शेती मध्ये AI वापरण्यासाठी तरतूद केली आहे. कुठलेही घोटाळे यात होणार नाही, माती खाण्याचे काम कोणी करणार नाही. शेतीमधील शाश्वतता आपण आणत आहोत.’’ अशीही माहिती यावेळी फडणवीसांनी बोलून दाखवलं.
()
(Edited by - Mayur Ratnaparkhe)