जयकुमार गोरे प्रकरणात शरद पवार गटाचा हात असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांचा हात असल्याचं सांगितलं. त्यांनी सभागृहात आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रभाकर देशमुख यांचं नाव घेत थेट गंभीर आरोप केले आहेत.
रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि प्रभाकर देशमुख आरोपीच्या संपर्कात होते. त्यांच्याकडून आरोपीला फोन केला जात होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, यावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझं नाव घेतलं आहे. तपासासाठी मी तयार आहे. माझा फोन तपासासाठी द्यायला तयार आहे', असे सप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर साम टीव्हीशी बोलताना प्रतिक्रिया दिली.