बंगळुरूच्या रस्त्यावर पांढरा फेस, पावसानंतर काय घडलं? VIDEO VIRAL
esakal March 24, 2025 04:45 AM

गेल्या काही आठवड्यांपासून उन्हाचा कडाका वाढला असाताना बंगळुरूत पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. मुसळधार पाऊस आणिु वीजांच्या कडकडाटाने शनिवारी बंगळुरूला धुवून काढलं. वेगवान वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे वातावरण थंड झालं होतं. दरम्यान, काही भागात रस्त्यांवर पांढरा फेस दिसत होता. यामुळे नागरिक संभ्रमात पडले.

बंगळुरूत रस्त्यावर पांढरा फेस दिसत असल्याचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इन्स्टाग्रामवर एका युजरने व्हिडीओ शेअर केला असून त्यात रस्त्यावर पांढऱ्या फेसाचा जाड थर दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यावर लिहिलंय की, अचानक आलेल्या पावसानंतर बंगळुरूतल्या रस्त्यावर पांढरा फेस जमा झालाय, हे काय आहे? बंगळुरूतले रस्ते असे पांढऱ्या फेसाने का भरलेत कुणाला माहिती आहे का असा प्रश्नही युजरने विचारलाय.

काही युजर्सनी हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबद्दल अंदाज मांडले आहेत. इन्स्टावर व्हिडीओ शेअर केलेल्या युजरने उत्तर देताना सांगितलं की, हा व्हिडीओ निमहंस डेअरी सर्कलजवळचा आहे.

बंगळुरूतला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून आतापर्यंत ४ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. यावर उलटसुलट प्रतिक्रियाही युजर्सनी दिल्या आहेत. काहींनी बंगळुरूच्या वातावरणावरून खिल्लीही उडवली आहे.

एका युजरने असा दावा केलाय की हे सोपनट ट्रीमुळे झालंय. पहिल्या पावसात या झाडाची फुलं पडली आणि ती पाण्यात मिसळली. यामुळे फेसासारखा पदार्थ तयार होतो. दुचाकीस्वारांसाठी हे धोकादायक आहे. गाड्या रस्त्यावरून घसरतात त्यामुळे अनेकदा ते गंमतीशीर वाटतं पण अपघाताची शक्यता असते.

काहींनी या व्हिडीओवर जोक करताना म्हटलं की, घरी जाताना कुणीतरी सर्फ एक्सेल टाकलंय. तर एकाने म्हटलं की, सोपनट ट्रीमुळे असेल तर इथं गाड्या घसरतील, सावध रहा. झाडांबाबतच्या कमेंटवर एकाने म्हटलं की, झाडांची फुलं पाण्यात मिसळून फेस तयार होतो. बंगळुरूत सगळ्या रस्त्यांवर ही फुलं आढळतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.