SRH vs RR: यशस्वी जयस्वालने स्वत:च्याच संघातील खेळाडूच्या छातीवर बॉल मारला; वेदनेने बिचाऱ्याचा जीव कळवळला! पाहा...
esakal March 24, 2025 04:45 AM

आयपीएल २०२५ मध्ये सनरायझर्स हैदराबादचा फलंदाजीचा दृष्टिकोन गेल्या हंगामासारखाच आहे. या हंगामातील पहिल्याच सामन्यात हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या केली. हैदराबादने राजस्थान रॉयल्सविरुद्ध ६ विकेटच्या मोबदल्यात २८६ धावा केल्या. हैदराबादकडून इशान किशनने तुफानी शतक झळकावले. प्रत्युत्तरात राजस्थान संघाला ६ विकेट्स गमावल्यानंतर केवळ २४२ धावा करता आल्या. हैदराबादने हा सामना ४४ धावांनी जिंकला. या दरम्यान डावाच्या ७ व्या षटकात, राजस्थानचा क्षेत्ररक्षक यशस्वी जयस्वालने एक केली. ज्यामुळे संघाचे मोठे नुकसान होऊ शकले असते.

७ व्या षटकाच्या ५व्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडने लाँग ऑफच्या दिशेने एक शॉट खेळला. तिथे उभा असलेला क्षेत्ररक्षक यशस्वी जयस्वालने पटकन चेंडू बॉलिंग एंडकडे फेकला. यावेळी संदीप शर्मा ट्रॅव्हिस हेडशी गप्पा मारण्यात व्यस्त होते. अशा परिस्थितीत त्याला चेंडू दिसला नाही आणि तो थेट त्याच्या छातीवर आदळला. चेंडू संदीपकडे खूप वेगाने आला.

चांगली गोष्ट म्हणजे संदीपला गंभीर दुखापत झाली नाही आणि तो पुन्हा गोलंदाजीमध्ये परतला. आयपीएल २०२५ मध्ये सनरायझर्ससाठी पहिल्याच सामन्यात ट्रॅव्हिस हेडने कहर केला. सनरायझर्सकडून ३१ चेंडूत ६७ धावांची खेळी केल्यानंतर ट्रॅव्हिस हेड बाद झाला. या डावात त्याने ९ चौकार आणि ३ षटकारही मारले. सनरायझर्सकडून डावाची सुरुवात करताना त्याने अभिषेक शर्मासोबत ४५ धावांची भागीदारी केली.

अभिषेक शर्मा लवकर बाद झाला असला तरी त्यानंतर सनरायझर्सकडून इशान किशनने शानदार खेळी केली. यादरम्यान, त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि संघाची धावसंख्या २०० धावांच्या पुढे नेली. इशान किशनने सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पहिल्यांदाच मैदानात उतरले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.