IPL 2025 Matches Live: आयपीएल 2025 चा थरार आज सायंकाळपासून ( 22 मार्च 2025 )सुरु होत आहे. ट्रॉफी जिंकण्यासाठी एकूण 10 टीम भारतातील विविध शहरात मॅच खेळणार आहेत. आयपीएल 2025 चे लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. ज्या प्रेक्षकांना मोबाईल आणि टीव्हीवर ऑनलाईन मॅच पाहायच्या आहेत त्यांना जिओ हॉटस्टारवर मॅच पाहाता येणार आहे. तर जिओ, एअरटेल आणि व्होडा-आयडिया कोणते रिचार्ज प्लान आहेत. ज्यात जिओ हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन दिले आहे ते पाहूयात….
जिओने आयपीएल सुरु होण्याआधीच आपल्या ग्राहकांनी एक शानदार ऑफर आणली आहे.जर कोणताही ग्राहक 299 रुपयांचा वा त्याहून अधिक किंमतीचा नवीन जिओ सिम विकत घेत असेल किंवा सध्याच्या मोबाईल क्रमांकावर 299 रुपयांचा रिचार्ज करत असेल तर त्याला संपूर्ण सिझन मोफत पाहायला मिळणार आहे. ही सुविधा जिओ हॉटस्टार ऐपद्वारे उपलब्ध होणार आहे. अशा पद्धतीने ग्राहकांना कोणताही अतिरिक्त खर्च न करता सर्व मॅच पाहायला मिळणार आहे.
या सोबत ग्राहकांना 4K क्वालिटीचा व्हिडीओ स्ट्रीमिंगचे सब्सक्रिप्शन देखील दिले जाणार आहे. ज्यामुळे उत्कृष्ट क्वालिटीत खेळ पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. हे सब्सक्रिप्शन ९० दिवसांपर्यंत व्हॅलिड असणार आहे. ग्राहकांना दीर्घकाळ याचा लाभ मिळणार आहे. ही ऑफर ३१ मार्च पर्यंत लागू असणार आहे.
एयरटेलच्या प्रीपेड रिचार्जमध्ये जिओहॉटस्टारचे सब्सक्रिप्शन मिळत नाही. परंतू काही खास प्लान्स मध्ये डिजनी प्लस हॉटस्टारचा लाभ घेता येतो. अलिकडेच डिजनी प्लस हॉटस्टार आणि जिओ सिनेमा यांच्या मर्जरमुळे जिओहॉटस्टार नावाचा नवा प्लॅटफॉर्म तयार झाला आहे. या प्लान्स सोबत युजर्स आयपीएल 2025 चा फ्रिमध्ये आनंद घेऊ शकतात.
3999 रुपये: 365 दिवसाची व्हॅलिडिटी
549 रुपये: 28 दिवसाची व्हॅलिडिटी
1029 रुपये: 84 दिवसाची व्हॅलिडिटी
398 रुपये: 28 दिवसाची व्हॅलिडिटी
या रिचार्जसोबत डिजनी + हॉटस्टार सब्सक्रिप्शन मिळते, ज्यामुळे एअरटेल यूजर्स आपल्या मोबाईलवर आयपीएलचे क्रिकेट सामने पाहू शकतात.
व्होडाफोन-आयडिया (VI) आपल्या तीन प्रमुख प्रिपेड रिचार्ज प्लान्सवर जिओहॉटस्टारचे सब्सक्रिप्शन ऑफर करत आहे
469 रुपये: 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन
994 रुपये: 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन
3699 रुपये: 365 दिवसांची व्हॅलिडिटी (वार्षिक) जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन
या प्लान्स सोबत तुम्ही जिओहॉटस्टारवर प्रिमियम कंटेंट, उदाहरणार्थ IPL 2025, मोफत पाहू शकता. तसेच हे रिचार्ज डेटा, कॉल आणि SMS बेनिफिट्स देखील देतात. लेटेस्ट माहितीसाठी आणि ऑफर्ससाठी VIच्या वेबसाईट वा एपवर देखील चेक करु शकता.