लाभांशाच्या घोषणेमुळे शेअर्समध्ये जोरदार तेजी; जाणून घ्या रेकॉर्ड तारीख आणि तपशील
Motherson Sumi Wiring India Ltd Dividend : गेल्या काही दिवसात शेअर बाजारात पुन्हा तेजीचा उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे कंपन्यांच्या शेअर्समध्येही वाढ दिसून येत आहे. काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी लाभांशाची घोषणा करीत आहेत. मदरसन सुमी वायरिंग कंपनीने गुंतवणूकदारांसाठी लाभांशाची घोषणा केली आहे. त्यामुळे शुक्रवारी, २१ मार्च रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. लाभांशाची रेकॉर्ड तारीखमदरसन सुमी कंपनीने गुंतवणूकदारांसाठी ०.५० रुपयांचा अंतरिम लाभांश घोषीत केला आहे. ज्याची रेकॉर्ड तारीख २८ मार्च २०२५ निश्चित करण्यात आली आहे. याआधीदेखील कंपनीने सलग तीन आर्थिक वर्षात लाभांशाची भेट दिली आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये कंपनीने ०.८५ रुपये, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ०.६५ रुपये आणि आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ०.८० रुपयांचा अंतिम लाभांश कंपनीकडून देण्यात आला.मदरसन सुमी कंपनीचे शेअर शुक्रवारी, ३.२० टक्क्यांनी वधारून ५४.५० रुपयांवर पोहचले आहेत. या तेजीनंतर काही गुंतवणुकदारांनी नफावसुलीचा फायदा घेतला.तरीही शेअर्स सध्या मजबूत स्थितीत आहेत. कंपनीची आर्थिक स्थितीMotherson Sumi Wiring India Ltd ही कंपनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल आणि सुमिटोमो वायरिंग सिस्टीमच्या या कंपन्यांमधील संयुक्त उपक्रम (JV)आहे. ही कंपनी ऑटो कंपोनंट्स बनवते.डिसेंबर २०२४ च्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर १६.६ टक्क्यांनी घसरून १४० कोटी रुपयांवर आला. तथापि, या कालावधीत कंपनीचा महसूल ८.८ टक्क्यांनी वाढून २,३००.३ कोटी रुपये झाला. कंपनीच्या शेअर्सची स्थितीकंपनीच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी १९ जून २०२४ रोजी ते ८०.०० रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर होते. या विक्रमी उच्चांकावरून, तो ८ महिन्यांपेक्षा थोड्या जास्त कालावधीत ४२ टक्क्यांहून अधिक घसरून गेल्या महिन्यात २८ फेब्रुवारी २०२५ रोजी ४६.०६ रुपयांवर आला, जो त्याच्या शेअर्ससाठी एका वर्षातील विक्रमी नीचांकी आहे. शेअर्स खालच्या पातळीपासून सावरले आहेत आणि सुमारे १८ टक्के सावरले आहेत, परंतु तरीही ते विक्रमी उच्चांकापेक्षा ३२ टक्क्यांहून अधिक खाली आहे.