पाकिस्तानातून प्रेमापोटी सीमा हैदर ही महिला चार मुलांसह भारतात दाखल झाली. प्रियकर सचिन मीणा सोबत तिने लग्न केले. त्यावेळी दोन्ही देशात या दोघांच्या प्रेम कहाणीने एकच खळबळ उडवली होती. सीमा गुप्तहेर असल्याचे वृत्त ही आले होते. पण यथावश सर्व काही सुरळीत सुरू आहे. सीमा आणि तिचा पती सचिन यांच्या घरी गोड बातमी आली आहे. सीमाने नोएडामधील कृष्णा हॉस्पिटलमध्ये एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानमधील तिच्या पतीने त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
गुलाम हैदरची तिखट प्रतिक्रिया
18 मार्च रोजी सीमा हैदरने गोंडस मुलीला जन्म दिला. त्यावर पाकिस्तानातून तिचा पती गुलाम हैदर याने प्रतिक्रिया दिली आहे. गुलाम हैदर याने युट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याने सीमा आणि सचिनचे हे मूल अवैध, नाजायज असल्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सीमाचा वकील ए. पी. सिंह याच्यावर सुद्धा निशाणा साधला आहे. हा वकील या नाजायज, अवैध नवजात बालकाच्या जन्मासाठी अभिनंदन करत आहे. त्याने भारताला बदनाम करणे थांबवावे असे गुलाम हैदर म्हणाला. हे सर्व भारताला बदनाम करत असल्याचा दावा हैदर याने केला आहे.
भारताला उगा बदनाम करताय
त्याने वकील सिंह याच्यावर निशाणा साधला आहे. असे अभिनंदन करून तो भारताची बदनामी करत आहे. सचिन आणि त्याचे कुटुंबिय तर खरे दोषी आहेत. त्यांना दोष द्या. भारताला बदनाम करू नका, असे गुलाम हैदर म्हणाला. त्याने भारत सरकारकडे विनंती केली आहे की, त्यांनी सीमा हिच्यावर कारवाई करावी. गेल्या दोन वर्षात आपण आपल्या चार मुलांना भेटू शकलो नसल्याची कैफियत मांडली. सीमा कोणताही घटनस्फोट, तलाक न घेता भारतात गेली आणि तिने सचिनशी लग्न केल्याचा आरोप त्याने केला. तिच्यावर कारवाई करण्याची विनंती त्याने केली.
तिने मोठी चूक केली आहे. तिला तर आता मूल सुद्धा झाले आहे. त्यामुळे आता माझे चार मूल मला परत करण्यात यावेत, अशी मागणी त्याने केली आहे. पोलीस आणि अधिकारी वर्ग या प्रकरणात मूकदर्शक झाल्याचा आरोप गुलाम हैदर याने केला. सीमाची बहिण रीमा तिच्या या निर्णयाने नाराज असल्याचा दावा त्याने केला. सीमा जर परत पाकिस्तानात आली तर आम्ही तिचा स्वीकार करू पण सचिनला कधीच जावाई स्वीकारणार नाही, असे रीमाने सांगितल्याचे हैदर म्हणाला.
सीमा बेधडकपणे अशा गोष्टी भारतात येऊन करत आहे. तिला थांबवणारं कोणीच नाही का? असा सवाल करत त्याने आपण कायदेशीर लढाई कधीच सोडणार नसल्याचे म्हटले आहे. मी माझ्या चार मुलांना परत आणण्यासाठी लढत राहणार असल्याचे तो म्हणाला.