Kunal Kamra News : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा हा त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या व्यंगात्मक गाण्यामुळे चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्याने आपल्या शोमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर भाष्य करताना एकनाथ शिंदेंवर व्यंगात्मक गाणं साजर केले. या गाण्याच्या सुरुवातच ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी..., अशी होती. हे गाणं सोशल मीडियाव्हर व्हायरल झाले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी हे गाणं शेअर केलं आहे.
कुणालच्या या गाण्यावर च्या शिवसेनेचे शिवसैनिक आक्रमक झाले असून आमदार मुरजी पटले यांनी अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कुणालच्या विरोधात एफआयआर दिली आहे. संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी ज्या स्टुडिओमध्ये हे गाणं शूट झालं त्या स्टुडिओची तोडफोड केली.
कुणाल याने आपल्या स्टँडअप काॅमेडीमध्ये एकनाथ शिंदेंची खिल्ली उठवली. तो म्हणाला की, आधी भाजपमधून फूटली आणि त्यानंतर शिवसेनेतून शिवसेना फूटली. नंतर राष्ट्रवादीमधून राष्ट्रवादी फूटली. एका मतदाराला नऊ बटणं दिली. चालू ज्यांनी केले होते ते ठाणे जिल्ह्यातून येतात, असे म्हणत कुणालने आपले व्यंगात्मक गाणं साजरं केलं
'ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी असे बोल असणाऱ्या या व्यंगात्मक गिताने ते गुवाहाटीला हाॅटेलमध्ये लपले, माझ्या नजरेतून तुम्ही बघाल तर ते गद्दार दिसतील. मंत्री नाही दलबदली, फडणवीसांच्या गोदीमध्ये दिसून येतील, अशा शब्दांचा वापर केला होता. तसेच परिवारवाद संपवायचा होता म्हणून थेट कुणाचा तरी बापच चोरला, अशी खिल्ली देखील कुणालने उडवली.
सुषमा अंधारेंनी ट्विट करत कुणाला कामरावर झालेल्या एफआयआरबाबत म्हटले आहे की, लेखक साहित्यिक चित्रकार विडंबनकार हे इथल्या समाज व्यवस्थेचा आरसा असतात. त्यांच्या साहित्यकृतीतून काही उतरतं तेव्हा चिडखोरपणा न करता त्यावर आत्मचिंतन करायला हवं.. आधीच्या काळात ते खेळकरपणे होत होतं.. आता मात्र गुणी लोकांवर खोट्या एफआयआर होतात.