Sonu Nimag: सोनू निगमच्या कॉन्सर्टमध्ये मोठा राडा; १ लाख प्रेक्षकांची गर्दीतून स्टेजवर दगडफेक, पाहा व्हिडिओ
Saam TV March 26, 2025 06:45 AM

लोकप्रिय गायक सोनू निगमने आपल्या आवाजाने सर्वांवर जादू केलीय. लहान मुले असो की वृद्ध सर्वांना सोनू निगमने आपल्या मधुर आवाजाने सर्वांनाच आपले फॅन बनवले आहे. सोनू कुठेही गेला तरी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमते. मात्र दिल्लीच्या एका महाविद्यालयात होत असलेल्या कार्यक्रमात गर्दी अनियंत्रित झाली. आणि लाखो लोकांच्या गर्दीतून स्टेजवर दगडफेक झाली.

सोनू निगमच्या लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान दगडफेक झालीय. तर काही प्रेक्षकांनी स्टेजवर बाटल्या फेकल्या. यामुळे आयोजकांना कार्यक्रम थांबवावा लागला. दगडफेक होत असल्याचं पाहून सोनूने प्रेक्षकांना शांत होण्याचं आवाहन केलं. या काळात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र या घटनेमुळे सोनूने परफॉर्मन्स अर्ध्यात थांबवला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.