महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदेगट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केले आहे. या सरकाचे आता सत्तेत 100 दिवस पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने बीबीसी मराठी 'राष्ट्र महाराष्ट्र' हा कार्यक्रम आज (24 मार्च) आयोजित करत आहे.
हा कार्यक्रम दुपारी 12 ते रात्री 9.30 या वेळेत मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होत आहे.
या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, महिला बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे सहभागी होत आहेत.
या कार्यक्रमात महायुती सरकारमधील नेते आजवरच्या 100 दिवसांच्या वाटचालीचा लेखाजोखा आणि पुढील कार्यकाळातील रुपरेषा मांडतील. विरोधी पक्षातील नेते सरकारसमोरील आव्हानं, सरकारची वाटचाल आणि अपेक्षा यावर भाष्य करतील.
हा कार्यक्रम कुठे पाहता येईल?हा दिवसभराचा कार्यक्रम फेसबूक, युट्यूबवर लाईव्ह स्वरुपात पाहता येईल. तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या श्रोत्यांना थेट प्रश्नही विचारण्याची संधी मिळणार आहे.
कार्यक्रमात कोण बोलणार, कधी बोलणार?आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद दुपारी 12 वाजता
पंकजा मुंडे यांच्याशी संवाद दुपारी 4 वाजता
आदिती तटकरे आणि उदय सामंत यांच्याशी संवाद दुपारी 5 वाजता
जयंत पाटील यांच्याशी संवाद संध्याकाळी 6 वाजता
एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद संध्याकाळी 8 वाजता