भारतीय संघाचा खेळाडू के एल राहुल आणि त्याची पत्नी आथिया शेट्टी यांच्या घरी एका लहान लक्ष्मीचे आगमन झालेले आहे. आथिया शेट्टीने एका लहान मुलीला जन्म दिलेला आहे. राहुल आणि आथिया यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिलेली आहे. राहुल याच कारणाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा पहिला सामना खेळू शकला नाही. त्यांनी नोव्हेंबरमध्ये ही माहिती दिली होती की आथिया शेट्टी आणि राहुल आई बाबा होणार आहेत. जेव्हा भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकून दुबई मधून भारतात परत आला तेव्हापासूनच या चर्चा होत्या की आयपीएल मधील सुरुवातीचे सामने राहुल खेळू शकणार नाही.
कमेंट सेक्शन मध्ये त्यांच्यासाठी अभिनंदन यांचा वर्षा होत आहे. बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ, कियारा अडवाणी, अर्जुन कपूर आणि मृणाल ठाकूर अशा अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
केएल राहुल आणि आथिया शेट्टी या दोघांनी जानेवारी 2023 मध्ये लग्न केले होते. त्यांचे लग्न आथिया शेट्टीचे वडील म्हणजेच सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊस येथे झाले होते. त्यांच्या लग्नामध्ये फक्त परिवारातील सदस्य आणि जवळचे मित्र सामील होते.
काही दिवसांपूर्वीच केएल राहुलने लखनऊ संघाचा ट्रेनिंग कॅम्प जॉईन केले होते. तसेच नाणेफेकच्या वेळी अक्षर पटेलने राहुलच्या गैरहजेरीबाबतचे कारण सांगितले नाही. याचे कारण नंतर समोर आले राहुलला दिल्ली कॅपिटलच्या मॅनेजमेंट ने त्याला लखनऊ विरुद्धचा सामना न खेळण्यासाठी परवानगी दिली होती. राहुल मुंबईमध्ये परत आला होता. आता 30 मार्च रोजी तो दिल्लीचा कॅम्प पुन्हा जॉईन करू शकतो.