सोलापूर : सोलापूरमध्ये तापमानाचा पारा चाळिशीच्या पार गेला असताना आणि उकाड्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत असताना आज दुपारी अचानक कोसळलेल्या पावसाने येथील नागरिकांना सुखद थंडावा दिला.
दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरू झालेला अवकाळी पाऊस सुमारे अर्धा तास पडत होता. अवकाळीच्या हजेरीनंतर उन्हाळ्यात पावसाळी वातावरणाचा अल्हाददायक अनुभव आला.
गहू, ज्वारीच्या राशी शेतात असलेला शेतकरी, काढणी राहिलेला द्राक्ष उत्पादक व आंबा उत्पादक मात्र यामुळे धास्तावला आहे.