Dividend Stocks : प्रत्येक शेअरवर मिळणार 10 रुपयांचा लाभांश, रेकाॅर्ड तारीख याच आठवड्यात
मुंबई : दुचाकी उत्पादक कंपनी टीव्हीएस मोटर कंपनी तिच्या प्रत्येक शेअरवर 1000% लाभांश देत आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2024-25 साठी प्रति शेअर 10 रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी कंपनीचा हा पहिला अंतरिम लाभांश आहे. टीव्हीएस मोटरने मागील गुरुवारी आर्थिक वर्ष 2024-25 साठी 10 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. कंपनीने यासाठी रेकाॅर्ड तारीखही निश्चित केली आहे. लाभांशाची रेकाॅर्ड तारीख याच आठवड्यात आहेत.
रेकाॅर्ड तारीखटीव्हीएस मोटरच्या संचालक मंडळाने त्यांच्या बैठकीत 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी 1 रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या 47,508,7114 पूर्ण पेड-अप इक्विटी शेअर्सवर 10 रुपये प्रति शेअर (1,000%) अंतरिम लाभांश घोषित केला आहे.अंतरिम लाभांश प्राप्त करण्यासाठी पात्र भागधारक निश्चित करण्यासाठी कंपनीने यासाठी बुधवार 26 मार्च ही रेकाॅर्ड तारीख निश्चित केली आहे.
शेअर्सचा परतावाटीव्हीएस मोटरचे शेअर्स सोमवारी 24 मार्च रोजी 30.15 रुपयांनी वधारून 2444 रुपयांवर बंद झाले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 2958 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर गेल्यापासून हा शेअर घसरत आहे. सध्याच्या पातळीवर शेअर्स त्याच्या शिखरावरून 18% घसरून ट्रेडिंग करत आहे. मात्र, ही घट असूनही टीव्हीएस मोटरने गेल्या तीन वर्षांत 297% आणि गेल्या पाच वर्षांत 536% परतावा दिला आहे.