Raid 2 Release Date : "नया शहर और नई रेड...", अजय देवगणच्या 'RAID 2' ची तारीख ठरली
Saam TV March 25, 2025 05:45 PM

बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) त्याच्या हटके स्टाइलसाठी ओळखला जातो. तरूणाईमध्ये त्याची विशेष केझ पाहायला मिळते. त्याने आजवर अनेक हिट चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने चारचाँद लावले आहेत. तो ॲक्शन हिरो आहे. याच ॲक्शन हिरोचा आता नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

देवगण लवकरच 'रेड २' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते देखील या चित्रपटासाठी खूप आतुर आहेत. या चित्रपटात महाराष्ट्राचा लाडका भाऊ (Riteish Deshmukh) देखील पाहायला मिळणार आहे. 'रेड 2' (Raid 2 Release Date ) हा ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

2018 ला 'रेड' प्रदर्शित झाला होता. आता सात वर्षांनी 'रेड 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगण आणि रितेश देशमुखने चित्रपटाच्या नवीन डेटचे पोस्टर सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहे. '' चित्रपट 1 मे 2025ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रेड 2'च्या या पोस्टला हटके कॅप्शन देण्यात आले आहे.

कॅप्शनमुळे प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. "नया शहर... नयी फाइल और अमय पटनायक की एक नई रेड..." असे जबरदस्त कॅप्शन देण्यात आले आहे. या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते चित्रपटाच्या कथेसाठी आतुर असल्याचे पाहायला मिळत आहे.

'रेड 2'मध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. तर रितेश देशमुखने खलनायकाची भूमिका साकारली आहे. 'रेड 2' चित्रपटाचे दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केले आहे. 'रेड 2'मध्ये रितेश, अजयसोबत वाणी कपूरही झळकणार आहे.

2018 साली रिलीज झालेल्या 'रेड'ला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली होती. आता येणारा 'रेड 2' देखील बॉक्स ऑफिस गाजवणार असल्याचे दिसत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.