आयपीएल 2025 स्पर्धेतील पाचवा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे. गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स हे दोन संघ आमनेसामने आहेत. नाणेफेकीचा कौल गमवल्याने पंजाब किंग्सला प्रथम फलंदाजी करावी लागली. पण पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना आक्रमक खेळीचं दर्शन घडवलं. पंजाब किंग्सने 20 षटकात 5 गडी गमवून 243 धावा केल्या आणि विजयासाठी 244 धावांचं आव्हान दिलं आहे. खर तर या सामन्यात 41 धावांचा फटका गुजरात टायटन्सला भरावा लागला आहे. गुजरात टायटन्सचा राशिद खान आणि आर्शद खानमुळे हा फटका बसला आहे. या दोघांनी प्रियांश आर्यचा झेल सोडला आणि गुजरातची पुरती वाट लागली. जीवदान मिळाल्यानंतर प्रियांश आर्यने आरपारची लढाई सुरु केली. प्रियांश आर्य 6 धावांवर खेळत असताना त्याने कागिसो रबाडाच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारला. अर्शद खान आणि रशीद खान दोघेही हा झेल पकडू शकले नाहीत.
प्रियांशने 23 चेंडूत 47 धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि 7 चौकार आले. म्हणजेच त्याने झेल सोडल्यानंतर आणखी 41 धावा जोडल्या. गुजरातच्या खेळाडूंनी झेल घेतला असता तर त्यांच्या संघाला या अतिरिक्त 41 धावा सहन कराव्या लागल्या नसत्या. प्रियांश आर्यचा हा पहिला सामना होता आणि त्याने त्याच्या पहिल्याच सामन्यात शानदार फलंदाजी केली. डावखुरा प्रियांश स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि त्यानेही तेच केले. त्याने 204 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 47 धावा केल्या.
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन) : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), साई सुधारसन, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रविश्रीनिवासन साई किशोर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा