स्वस्तात चांगली कार खरेदी करण्याचा तुमचा प्लॅन असेल तर मग तुम्ही देशातील ‘या’ 5 शहरांमध्ये जाऊ शकता. याचे कारण म्हणजे ‘या’ शहरांमध्ये तुम्हाला सर्वात कमी ऑन-रोड किमतीत कार मिळू शकतात, पण असे कसे होते? समजून घेऊया.
भारतात कंपनी ज्या किमतीत कार ऑफर करते, ती त्यांची एक्स-शोरूम किंमत आहे. त्याचबरोबर कार खरेदी करण्यासाठी जाताना GST, रोड टॅक्स, रजिस्ट्रेशन चार्जेस, इन्शुरन्स अशा इतर अनेक खर्चांना सामोरे जावे लागते. यानंतर जी कारची किंमत ठरवली जाते, ती मग गाडीची ऑन रोड किंमत असते.
यामध्ये GST आणि इन्शुरन्सच्या किमती केंद्रीकृत असतात, पण प्रत्येक राज्यात रजिस्ट्रेशन चार्ज आणि रोड टॅक्स वेगवेगळे असतात, ज्याचा परिणाम कारच्या किमतीवर होतो. देशातील ‘या’ 5 शहरांमध्ये कारची किंमत खूपच कमी आहे.
देशातील विविध राज्यांमध्ये रोड टॅक्सची रचना वेगवेगळी आहे. त्यामुळे येथे कारची किंमतही वेगवेगळी आहे. त्यानुसार त्या-त्या राज्यांच्या राजधानीच्या नावानुसार ही 5 शहरे आहेत जिथे तुम्हाला देशातील सर्वात स्वस्त कार मिळू शकते.
हिमाचल प्रदेशची राजधानी सिमल्यात तुम्हाला सर्वात स्वस्त कार मिळू शकते. हे देशातील सर्वात कमी रोड टॅक्स असलेल्या राज्यांपैकी एक आहे. राज्य सरकार 1.0 लिटरपर्यंत इंजिन क्षमतेच्या कारवर 2.5 टक्के आणि 1.0 लिटरपेक्षा जास्त इंजिन क्षमतेच्या कारवर 3 टक्के कर आकारते.
केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी देखील अशा शहरांपैकी एक आहे जिथे आपल्याला खूप कमी रोड टॅक्स भरावा लागतो. येथे रोड टॅक्स म्हणून फक्त 6 ते 9 टक्के कर भरावा लागतो.
चंदीगड या आणखी एका केंद्रशासित प्रदेशात रस्ते कराची रचना अगदी सोपी आहे. त्याऐवजी तुम्ही दिव्यांग प्रवर्गातील असाल तर तुम्हाला येथे शून्य टक्के रोड टॅक्स भरावा लागतो. उर्वरित वाहनांकडून 6 टक्क्यांपर्यंत रोड टॅक्स आकारला जातो.
हरयाणातील गुरुग्राममध्ये कार खरेदी करणे देखील खूप स्वस्त आहे. येथे केवळ 5 ते 10 टक्के रोड टॅक्स भरावा लागतो. यामुळे येथे तुम्हाला अत्यंत कमी रजिस्ट्रेशन चार्जमध्ये कार खरेदी करण्याचा पर्याय मिळतो.
जम्मू आणि काश्मीर: केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरची रस्ते कराची रचना देशातील सर्वात सोपी आहे. येथे तुम्हाला प्रत्येक कारसाठी 9 टक्के रोड टॅक्स भरावा लागतो.