IPL 2025 : मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्स, केकेआर आरसीबी आणि पंजाब किंग्सविरुद्ध एकच सामना खेळणार, कारण…
GH News March 29, 2025 07:09 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत जेतेपदाचा मान कोणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत होणारी उलथापालथ धाकधूक वाढवणारी आहे. काल परवापर्यंत सनरायजर्स हैदराबाद हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी होता. मात्र लखनौ सुपर जायंट्सने केलेल्या पराभवानंतर चित्र पालटलं. पहिल्या स्थानावरून थेट सहाव्या स्थानी घसरण झाली. त्यामुळे कधी काय होईल सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. पहिल्या सामन्यात पराभवानंतर दुसऱ्या सामन्यात कमबॅकची धडपड सुरु झाली आहे. तर दुसऱ्या सामन्यात सामन्यात पराभूत झाल्याने गुणतालिकेत उलथापालथ झालेली पाहून चाहते डोक्यावर हात मारत आहेत. असं असताना सनरायझर्स हैदराबाद हा फलंदाजीच्या दृष्टीने सर्वात तगडा संघ मानला जात आहे. त्यामुळे या संघाशी दोनदा सामना नको रे बाबा अशी स्थिती आहे. राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांना असंच वाटत असेल. कारण पहिल्या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी 286 धावा केल्या होत्या. तर 44 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. पण चाहत्यांसाठी एक चांगली बातमी म्हणजे राजस्थान रॉयल्सचा साखळी फेरीत पुन्हा हैदराबादशी सामना होणार नाही. कारण दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात आहेत. कसं काय...

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.