आयपीएलच्या 18 व्या मोसमातील सहाव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 152 धावांचं आव्हान दिलं आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 151 धावा केल्या. कोलकाताचे गोलंदाज राजस्थानला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्यात यशस्वी ठरले आहेत. राजस्थानच्या गोटात यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायर यासारखे तगडे फलंदाज असूनही राजस्थानला जेमतेम 150 पार मजल मारता आली. दोन्ही संघांचा हा मोसमातील दुसरा सामना आहे. दोन्ही संघांची पराभवाने सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता केकेआरला पहिला विजय मिळवायचा असेल तर 152 धावा कराव्या लागणार आहेत. आता केकेआर विजयी आव्हान पूर्ण करते की राजस्थान विजयाचं खातं उघडते? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षाना, तुषार देशपांडे आणि संदीप शर्मा.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.