IPL 2025 Point Table : कोलकाता नाईट रायडर्सची नवव्या स्थानावरून थेट सहाव्या स्थानी झेप, असा पडला फरक
GH News March 27, 2025 02:06 AM

आयपीएल 2025 स्पर्धेतील पहिल्या टप्प्याचे सामने पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्याची रंगत वाढू लागली आहे. खरं तर पहिल्या सात सामन्यातील विजय आणि पराभव प्लेऑफचं गणित कसं असेल हे ठरवत असतात. त्यामुळे सुरुवातीपासून विजयी घोडदौड ठेवण्याचा मानस संघांचा असतो. यासाठी पहिल्या सामन्यापासून प्रयत्न सुरु आहे. प्रत्येक संघ एकूण 14 साखळी फेरीचे सामने खेळणार आहे. त्यामुळे एकूण 14 टप्पे प्रत्येक संघाच्या वाटेला येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पार पडला. हा सामना कोलकाता नाईट रायडर्सने सहज जिंकला. खरं तर या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाची कुठेच छाप पडली नाही. फलंदाजी आणि गोलंदाजीत फेल गेले. तर कोलकाता नाईट रायडर्सने या सामन्यात पहिल्या षटकापासून पकड दाखवली होती. राजस्थानला मोठी धावसंख्या करण्यापासून प्लेऑफमध्ये रोखलं. त्यानंतर झटपट विकेट घेत राजस्थान रॉयल्सला 151 धावांवर रोखलं. विजयासाठी मिळालेल्या 152 धावांचं आव्हान कोलकाता नाईट रायडर्सने 2 गडी गमवून पूर्ण केलं.

कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सला पराभूत करत थेट नवव्या स्थानावरून सहाव्या स्थानी झेप घेतली. दोन गुणांची कमाई करत लखनौ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांना मागे टाकलं आहे. पहिल्या सामन्यात आरसीबीकडून पराभव झाल्याने नेट रनरेटही बिघडला होता. खरं तर या सामन्यात हा नेट रनरेट दुरूस्त करण्याची वेळ आली होती. पण तसं काही झालं नाही. त्यामुळे नेट रनरेटमध्ये फारसा काही फरक पडला नाही. आरसीबीकडून पराभवानंतर नेट रनरेट हा -2.137 इतका होता. त्यात थोडा फरक पडला असून सहाव्या स्थानी आहे. नेट रनरेट -0.308 झाला आहे.  दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सचा पाय आणखी खोलात गेला आहे. कारण सलग दोन सामन्यात पराभव मिळाला आहे. त्यात नेट रनरेटही घसरला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.