Crime News: धक्कादायक! 'पुढच्या वेळी गोळी कपाळावर...'; भाजप माजी मंत्र्यांच्या हॉटेलमध्ये अंदाधूंद गोळीबार, काय घडलं?
esakal March 30, 2025 02:45 AM

उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे गुन्हेगार आता नेत्यांनाही लक्ष्य बनवत आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. मुझफ्फरनगरमध्ये महामार्गावरील भाजप नेत्याच्या हॉटेलमध्ये अनेक राउंड गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप युवा मोर्चाचे माजी मंत्री नितीश मलिक यांच्या हॉटेलवर स्कॉर्पिओ कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी अनेक राउंड गोळीबार केला. गोळीबारादरम्यान तिथे जेवणाऱ्या लोकांमध्ये घबराट पसरली. गोळीबार करणारे हल्लेखोर नितीश मलिक येतील तेव्हा त्यांना सांगा की पुढची गोळी फक्त त्यांच्या डोक्यातच झाडली जाईल, अशी धमकी देऊन निघून गेले आहेत.

या घटनेशी संबंधित एक देखील समोर आला आहे. पोलीस या घटनेची चौकशी करतील असे सांगत आहेत. भाजप युवा मोर्चाचे माजी राज्यमंत्री नितीश मलिक यांचे मुझफ्फरनगर महामार्गाजवळ पंचेडामध्ये संगम हॉटेल आहे. काल रात्री, स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या काही अज्ञात हल्लेखोरांनी हॉटेलवर अंदाधुंद गोळीबार केला.

यावेळी तिथे जेवणाऱ्या लोकांमध्ये घबराट पसरली. गोळीबार करणाऱ्या लोकांनी आपले चेहरे रुमालाने झाकले होते. या घटनेनंतर हॉटेलमध्ये महिलाही खूप घाबरल्या होत्या. गोळीबाराची घटना घडवून आणल्यानंतर, हल्लेखोर पुढच्या वेळी त्याच्या कपाळावर गोळी मारली जाईल अशी धमकी देऊन निघून गेले.

त्या गुंडांनी त्याला धमकी दिली की, त्याला सांग, पुढच्या वेळी मी त्याच्या कपाळावर गोळी मारेन. समाजकंटकांकडून येणाऱ्या धमक्यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. हल्लेखोरांची ओळख अद्याप पटू शकली नाही. सध्या पोलीस अधिकारी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याबद्दल बोलत आहेत. आरोपींना लवकरच अटक केली जाईल असा पोलिसांचा दावा आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.