दिशा सालियन हत्या प्रकरण आता पुन्हा चर्चेत आले आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियान यांनी या प्रकरणी पुन्हा याचिका दाखल केली आहे. तसेच या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सतीश सालियन यांनी मंगळवारी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार पत्र सादर केले. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर दिशाच्या मृत्यूचा आरोप करण्यात आला आहे. तर आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. दिशा सालियानचा पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर आला आहे. यात अनेक मोठे खुलासे झाले आहेत.
सतीश सालियान यांनी दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरेंव्यतिरिक्त अभिनेता दिनो मोरिया, सूरज पंचोली, अंगरक्षक परमबीर सिंग, सचिन वाजे आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांनाही आरोपी म्हणून नाव दिले आहे. तसेच त्यांनी या याचिकेत अनेक खुलासे केले होते. तर आता दिशा सालियानचा पोस्टमोर्टम रिपोर्ट मिळाला आहे. मात्र या रिपोर्टमधून सतीश सालियान यांचा एक दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. .
८ जून २०२० रोजी मृत्यू झाला होता. मालाडमधील एका इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच तिने आत्महत्या केल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र आता तिच्या पोस्टमोर्टम रिपोर्टमधून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पोस्टमोर्टम रिपोर्टनुसार, दिशा खाली पडल्यानंतर तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच तिच्या शरिरावर अनेक ठिकाणी जखमा होत्या.
दिशा सालियान खाली पडल्यानंतर तिच्या नाकातोंडातून रक्तस्त्राव झाला होता, असं या रिपोर्टमधून समोर आले आहे. यामुळेच आता तिच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेतील एक दावा खोटा असल्याचे बोलले जात आहे. तिच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय की, दिशाचा मृतदेह आढळून आल्यानंतर तिच्या शरिरावर जखमा नव्हत्या. तसेच रक्तही दिसून आले नाही, असं म्हटलं आहे. मात्र आता या पोस्टमोर्टम रिपोर्टमधून हा दावा चुकीचा ठरत आहे.