GT vs MI : मुंबईचा सलग दुसरा पराभव, गुजरातने विजयाचं खातं उघडलं, पलटणवर 36 धावांनी मात
GH News March 30, 2025 03:06 AM

गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) शुबमन गिल याच्या नेतृत्वात घरच्या मैदानात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) 18 व्या मोसमातील पहिला विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 36 धावांनी मात केली आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात गुजरातने मुंबईला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 160 धावाच करता आल्या. मुंबईचा हा या मोसमातला एकूण आणि सलग दुसरा पराभव ठरला. कर्णधार हार्दिक पंड्या मुंबईला पहिला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.

मुंबईची बॅटिंग

मुंबईच्या फलंदाजांनी या सामन्यात घोर निराशा केली. गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांसमोर पलटणचे बॅट्समन निष्प्रभ ठरले. रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन या दोघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर हार्दिक पंड्या याने निराशा केली. तसेच तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र दोघेही निर्णायक क्षणी आऊट झाले. त्यामुळे मुंबई विजयापासून फार दूर राहिली.

मुंबईसाठी सूर्यकुमार यादव याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. सूर्याने 28 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 1 फोरसह 48 रन्स केल्या. तिलक वर्मा याने 36 बॉलमध्ये 39 रन्स केल्या. रोहित शर्मा याने 8, रायन रिकेल्टनने 6 आणि रॉबिन मिन्झने 3 धावा केल्या आणि मैदानाबाहेरचा रस्ता धरला. हार्दिक पंड्या 17 चेंडूत 11 धावा करुन आऊट झाला. तर अखेरीस नमन धीर आणि मिचेल सँटनर या दोघांनी नाबाद खेळी करुन पराभवातील अंतर कमी केलं. नमन आणि सँटनर या दोघांनी प्रत्येकी 18-18 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराज या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर कगिसो रबाडा आणि आर साई किशोर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

गुजरातने विजयाचं खातं उघडलं

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेन्ट बोल्ट, मुजीब उर रहमान आणि सत्यनारायण राजू.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.