
इंडियन प्रीमियर लीगमध्ये बुधवारी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना पार पडला. या लढतीमध्ये केकेआरने राजस्थानचा 8 विकेट्सने पराभव केला. राजस्थानचा हा सलग दुसरा पराभव आहे. हा सामना क्विंटन डीकॉकच्या वादळी खेळीसह मैदानात घडलेल्या आणखी एका घटनेमुळे चर्चेत आला. कडेकोट सुरक्षा भेदून चाहता मैदानात घुसला आणि थेट राजस्थानचा कर्णधार रियान परागजवळ पोहोचला. याआधी असाच प्रकार विराट कोहलीबाबतही घडला होता. यामुळे आयपीएलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.