आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) नववा सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आमनेसामने आहेत. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून हार्दिक पंड्या याने कर्णधार म्हणून कमबॅक केलं आहे. तसेच हा सामना रोहित शर्मासाठी खास ठरला आहे. रोहितने गुजरातविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात पाय ठेवताच इतिहास घडवला आहे. रोहितच्या टी 20 कारकीर्दीतील हा 450 वा सामना ठरला आहे. रोहितने यासह एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
रोहित शर्मा सर्वाधिक टी 20 सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. रोहितच्या टी 20 कारकीर्दीतील हा 450 वा सामना ठरला आहे. दिनेश कार्तिक भारतासाठी सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. कार्तिकने 412 टी 20 सामने खेळले आहेत. रोहित शर्माने टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेनंतर या सर्वात छोट्या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे आता रोहित फक्त आयपीएल सामन्यांतच (T20) खेळताना दिसणार आहे.
रोहित शर्मा – 450 सामने
दिनेश कार्तिक – 412 सामने
विराट कोहली – 401 सामने
महेंद्रसिंह धोनी – 393 सामने
रोहितची ऐतिहासिक कामगिरी
दरम्यान सर्वाधिक टी 20 सामने खेळण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा किरॉन पोलार्ड याच्या नावावर आहे. पोलार्डने 695 टी 20 सामने खेळले आहेत. तसेच रोहित 450 आणि त्यापेक्षा अधिक टी 20 सामने खेळणारा एकूण 12 वा खेळाडू ठरला आहे.
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेन्ट बोल्ट, मुजीब उर रहमान आणि सत्यनारायण राजू.