Suryakumar Yadav helmet : हेल्टेमवर बॉल लागताच सूर्यकुमार मैदानात कोसळला, चाहत्यांना टेन्शन,व्हीडिओ व्हायरल
GH News March 30, 2025 04:05 AM

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील नवव्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनसामने होते. गुजरातने या सामन्यात मुंबईसमोर विजयासाठी 197 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 160 धावाच करता आल्या. मुंबईचा अशाप्रकारे 36 धावांनी पराभव झाला. मुंबईचा हा सलग दुसरा पराभव ठरला. या सामन्यादरम्यान एका घटनेमुळे क्रिकेट चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. सामन्यातील दुसऱ्या डावात सूर्यकुमार यादव याला बॅटिंग करताना हेल्मेटवर बॉल लागला. त्यामुळे सूर्यकुमार मैदानात कोसळला. हे सर्व पाहून क्रिकेट चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला. काय झालं? सूर्याला लागलं का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला. मात्र काही मिनिटांनंतर सूर्या उठला आणि खेळू लागला. त्यामुळे चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

नक्की काय झालं?

मुंबईने 197 धावांचा पाठलाग करताना 13 ओव्हरमध्ये 108 धावा केल्या. तर गुजराकडून प्रसिध कृष्णा 14 वी ओव्हर टाकायला आला. प्रसिधने टाकलेला पहिलाच स्लोअर बाऊन्सर होता. प्रसिधने टाकलेला बॉल सूर्याला समजला नाही. त्यामुळे तो बाऊन्सर बॉल सूर्याच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. त्यामुळे सूर्याला साधारण झटका लागला आणि तो मैदानात पडला. सूर्या पडल्याने क्रिकेट चाहत्यांची धाकधूक वाढली. सूर्या पडताच गुजरातचे खेळाडू त्याच्या दिशेने आले. सूर्याची चौकशी करु लागले.

एका बाजूला चाहत्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन होतं. तर दुसर्‍या बाजूला फिजिओ धावत-धावत मैदानात आले. फिजिओकडून सूर्याची आवश्यक कन्कशन टेस्ट करण्यात आली. सुदैवाने सूर्याला काही झालं नाही. सूर्या ठणठणीत होता. सूर्या बॅटिंग करु शकतो, हे जाहीर करण्यात आलं. त्यानंतर पु्न्हा एकदा खेळाला सुरुवात झाली. सूर्याने काही वेळ बॅटिंग केली. मात्र त्यानंतर सूर्या आऊट झाला. सूर्याने 28 बॉलमध्ये 48 रन्स केल्या. सूर्याला प्रसिध कृष्णा याने आऊट केलं.

सूर्या सुखरुप

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेन्ट बोल्ट, मुजीब उर रहमान आणि सत्यनारायण राजू.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.