अकोल्यात रेल्वे टीसीची मालगाडीसमोर उडी; थरकाप उडवणारी घटना, पोलिसांच्या भीतीने जीवन संपवलं?
Marathi April 01, 2025 06:25 PM

अकोला : अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर एका टीसीने आत्महत्या (Akola Crime News) केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुर्तीजापुरात तिकीट तपासणीकाने अर्थातच रेल्वे टीसीने टोकाचे पाऊल उचलत रेल्वेसमोर उडी घेत आपलं जीवन संपवलय. मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरच मालगाडी समोर उडी घेत टीसीने आत्महत्या केली आहे. काल (31 मार्च) रात्रीच्यादरम्यान ही आत्महत्येची (Crime News) घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक कलहातून टीसीने टोकाची भूमिका घेतल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी‌ दिली आहे. सुमेध मेश्राम असं या आत्महत्या करणाऱ्या रेल्वे टीसीचं नाव आहे. विशेष म्हणजे सुमेध मेश्रावर यांच्यावर अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीचा गंभीर स्वरूपाचा गुन्हे दाखल आहे. पोलीस अटक करणार होते, याच भीतीने मेश्राम यांनी आत्महत्येसारखं टोकाचं उचलल्याचं बोललं जाते आहे.

काय आहे सुमेध मेश्राम यांच्या आत्महत्येचं खरं कारण?

40 वर्षीय सुमेध मेश्राम हे मागील काही दिवसांपासून घरगुती कारणामुळे तणावात होते. काल रात्री मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 1 वर कर्तव्य बजावत असताना सुमेध मेश्राम यांनी रेल्वे समोर उडी घेतली. मुर्तिजापूरवरून भुसावळकडे जाणाऱ्या मालगाडी समोर उडी घेतल्याने ते गंभीर जखमी झालेत. यात सुमेध मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला होता. रात्रीच घटनास्थळी मुर्तिजापूर पोलीस दाखल झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास अकोला लोहमार्ग पोलीस करत आहेत.

सुमित मेश्राम यांना होती अटकेची भीती?

सुमेध मेश्राम यांच्यावर अमरावती जिल्ह्यातील बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये नुकतेच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. एका 14 वर्षे अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार मेश्राम यांच्यावर अत्याचार केल्यासह विनयभंग त्याशिवाय बाल संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे झाले होते. पीडित मुलीवर मूर्तिजापूर शहरातीलचं एका कॉलनीमध्ये घर सामान काढण्याच्या बहाण्याने तिच्यावर बळजबरी अत्याचार केल्याचा आरोप मेश्राम यांच्यावर होता. कुणाला काही सांगितलं तर आईसह तुला जिवे ठार मारू, अशी धमकी देखील पीडितीला त्यांनी दिल्याचा आरोप पोलीस तक्रारीत करण्यात आला होता. यात पीडित मुलीला गुंगीचं औषध दिल्याचाही आरोप करण्यात आला होता.

अखेर पीडित मुलीने सर्व प्रकार आईला सांगितला. आईने अमरावती जिल्ह्यातील बडनेरा पोलीस स्टेशन गाठलं. नातेवाईकांच्या तरीवरून मृतक सुभेध मेश्राम यांच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेत. यामध्ये 64 (2) (m), 64(2)(f), 65(1), 65(2), 351 (3) भान्या स सहकलम 4, 6 पोक्सो प्रमाणे कलमांची नोंद आहे. पुढे हा तपास मुर्तीजापुर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर पोलीस सुमेध मेश्राम यांना अटक करण्यासाठी रवाना झाली. मात्र अटकेच्या भीतीने त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जातो आहे.

टीसीच्या आत्महत्येने रेल्वेच्या वर्तुळात खळबळ :

या संपूर्ण घटनेनंतर अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील रेल्वेच्या कर्मचारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.‌ मृतक सुमेध मेश्राम यांच्यावर गुन्ह्यानंतर कोणी दबाव टाकत होतं का?. हा प्रश्न यातून उपस्थित होतो आहे.‌ याप्रकरणी मुर्तीजापुर पोलिस आणि लोहमार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हे ही वाचा

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.