गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी तब्बल हजार चौरस फुटाची रांगोळी काढण्यात आली.
विक्रोळीच्या गणेश मैदानात ही रांगोळी साकारण्यात आली आहे.
या ठिकाणच्या सार्वजनिक उत्सव समिती द्वारा नागरिकांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला.
ही रांगोळी साकारण्याकरिता रांगोळी कलाकार विनोद कोळी यांनी तब्बल 14 तास परिश्रम घेतले
Amravati News: गुढीपाडव्याच्या निमित्ताने अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी गर्दीअमरावती -
गुढीपाडव्याच्या निमित्ताने अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी गर्दी....
नवीन मराठी वर्ष सुख समृद्धीच जावो हे भाविकांकडून अंबा मातेला साकडे...
गुढीपाडव्याच्या निमित्ताने अंबामातेच्या मंदिरात उभारली गुढि.
गुढीपाडव्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं अंबादेवी मंदिरात आयोजन..
Nagpur News: माधव नेत्रालयाशी जोडलेल्या सर्वांचे अभिनंदन - पीएम मोदीनागपूर -
पंतप्रधान नरेंद्र मोदी
"गुढी पाडव्याचा आणि नवीन वर्षाच्या अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा" मराठीतून दिल्या शुभेच्छा...
आज मला इथे येण्याचं भाग्य लाभलं... आजचा दिवस विशेष आहे.
आजपासून नवरात्री पर्व सुरू होत आहे..
भगवान झुलेला यांचा अवतरण दिवस आहे..
100 वर्ष पूर्ण होत आहे..
आज हेडगेवार आणि गुरुजी यांना नमन करण्याचे भाग्य लाभले..
दीक्षाभूमीत जाऊन बाबासाहेब आबेडकर यांना नमन केलेत.
ज्ञान गैरव आणि मानवसेवा ही कणा कणात वास करते,
माधव नेत्रालाय अनेक दशकापासून सेवा करण्याचं काम करत आहे.
लोकांच्या आयुष्यात प्रकाश आला.. नवीन निर्मना झाल्यावर हजारो लोकांच्या आयुष्यात अंधकार सुरू होऊन प्रकाश येईल..
माधव नेत्रालयाशी जोडलेल्या सर्वांचे अभिनंदन करतो..
Pune News: पुण्यातील आप्पा बळवंत चौकातून निघाली शोभायात्रापुणे -
पुण्यातील आप्पा बळवंत चौकात शोभायात्रा निघाली आहे
या शोभायात्रेमध्ये तीन वेगळे रथ
एका रथावर अभिजात मराठी भाषेला दर्जा मिळावा असा हा रथ
शोभायात्रा तांबडे जोगेश्वरी जवळ आली
कोरटकला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलेकोरटकला व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे न्यायालयात हजर करण्यात आले आहे
सरकारी वकील आणि इंद्रजीत सावंत यांच्यातर्फे असीम सरोदे ऑनलाइन उपस्थितीत आहेत
मात्र कोरटकर याचे वकील अद्याप ऑनलाइन हजर झालेले नाहीत त्यामुळे सुनावणीला सुरुवात झालेली नाही
Breaking News: राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये स्फोटराजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये स्फोट
हरीभाऊ बागडे थोडक्यात बचावले
तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉफ्टरमध्ये स्फोट
Nagpur News: लोकांना दृष्टीने देण्याच काम माधव नेत्रालयांकडून केले जात आहे - मुख्यमंत्रीनागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -
मागील अनेक वर्षांपासून माधव नेत्रालयाने अनेकांचा आयुष्यात प्रकाश आणण्याचे काम करत आहे..
लोकांना दृष्टीने देण्याच काम माधव नेत्रालयांकडून केले जात आहे...
माधव नेत्रालयाच मोठं काम या क्षेत्रात आहे,
ईश्वरीय सेवा कार्य असेच सुरू राहिल अश्या शुभेच्छा देतोय.
Pune News: पुणे पोलीस आयुक्तांनी गुढीपाडव्यानिमित्त गुन्हेगारांना दिला सल्ला"गुन्हेगारांनो नवीन वर्षात संकल्प करा आणि सुधरा"
पुणे पोलीस आयुक्तांनी गुढीपाडव्यानिमित्त गुन्हेगारांना दिला सल्ला
शहरात शांतता राहावी यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दगडूशेठ गणपती चरणी केली प्रार्थना
श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी गुढीपाडव्यानिमित्त पोलीस आयुक्तांनी केला अभिषेक
तर पत्नीसह आनंदाची गुढी उभारून
मराठी नववर्षाच्या निमित्ताने पुणे शहरातील गुन्हेगारांनो नवीन वर्षात संकल्प करा आणि सुधरा अशी तंबीच देण्यातवलीय
Nagpur News: PM मोदी यांच्या नागपूर दौरा दरम्यान नरेंद्र मोदी यांचे नागपूर शहरात ठिकठिकाणी स्वागतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौरा दरम्यान नरेंद्र मोदी यांचे नागपूर शहरात ठिकठिकाणी स्वागत
भाजप कार्यकर्त्यांची चौका चौकात स्वागतासाठी मोठी गर्दी ,कार्यकर्त्यां कडून मोदी मोदी च्या जोरदार घोषणा
नरेंद्र मोदी यांचा दौरा आमच्यासाठी आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकी साठी ऊर्जा देणारा असल्याचा कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया
Nagpur News: पीएम नरेंद्र मोदी दीक्षभूमीवर दाखलपीएम नरेंद्र मोदी दीक्षभूमीवर दाखल
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केलं अभिवादन
Nagpur News: पीएम मोदींच्या हस्ते होणार माधव नेत्रालयच्या प्रीमियम सेंटरचे लोकार्पणनागपूर -
नागपुरातील माधव नेत्रालयच्या प्रीमियम सेंटरचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ चालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर संघ चालक मोहन भागवत थोड्या वेळात पोहचतील
Nashik News: नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात आजपासून वासंती नवरात्र उत्सवाला सुरुवातनाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात आजपासून वासंती नवरात्र उत्सवाला सुरुवात होत असते..
या निमित्ताने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिराच्या कळसाजवळ शुभचिन्ह अंकित ध्वज लावला जातो..
मंदिरातील पुजारी परिवाराचे संदीप पुजारी हे 70 फूट उंच कळसाजवळ जाऊन आज हा ध्वज लावला.
मंदिरात पहाटेपासूनच महापूजा आणि कळसावर लावण्यात आलेला ध्वज उत्सवाला सुरुवात झाल्याचा संकेत देतो.
Kolhapur News: प्रशांत कोरटकर याला आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणारकोल्हापूर
प्रशांत कोरटकर याला आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार
कोल्हापूर सत्र न्यायालयात कोरटकरला केलं जाणार हजर
आज कोरटकरला विशेष सुट्टीच्या न्यायालयात केलं जाणार हजर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकर यांना पोलिस कोठडी
सूर्यकांत पोवार हे सरकारी वकील, इंद्रजीत सावंत यांच्या मार्फत असीम सरोदे व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे युक्तिवाद करणार
कोरटकर याच्या बाजूने सौरभ घाग युक्तिवाद करणार
Nagpur News: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमीसाठी रवानानागपूर -
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमीसाठी रवाना
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमीवर 2017 मध्ये आले होते...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलेशाला अभिवादन करतील, त्यानंतर तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला फुल अर्पण करतील.
Pune News: पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार दगडूशेठ चरणीपुणे -
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार दगडूशेठ चरणी
श्रीमंत दगडूशेठ गणपतीला अमितेश कुमार यांचा सपत्नीक अभिषेक
गुढीपाडव्यानिमित्त सपत्नीक अमितेश कुमार बाप्पाच्या चरणी नतमस्तक
PM Narendra Modi: पीएम नरेंद्र मोदी नागपूरमध्ये दाखलनागपूर-
पीएम नरेंद्र मोदी नागपूरमध्ये दाखल
पीएम नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी
ठिकठिकाणी महिला पदाधिकारी आणि बॅनरबाजी करत पाहायला मिळत आहे.