गडहिंग्लज : हुनगिनहाळ (ता. गडहिंग्लज) येथे वाहनाने ठोकरल्याने एकाचा मृत्यू झाला. सचिन महादेव डवरी (वय ४४, रा. मेवेकर चाळ, साधना हायस्कूल मागे, गडहिंग्लज) असे मृताचे नाव आहे. १९ मार्चला रात्री नऊ वाजता झालेल्या अपघाताची आज येथील पोलिसांत नोंद झाली आहे.
गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील हुनगिनहाळ कॉर्नरजवळ सचिन उभा राहिले होते. यावेळी एका अनोळखी वाहनाने त्यांना ठोकरले. सचिनला उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. तेथून सीपीआरमध्ये दाखल केले होते. मात्र, २० मार्चला त्यांचा मृत्यू झाला. दादानाथ महादेव डवरी यांनी आज येथील पोलिसांत फिर्याद दिली आहे. अनोळखी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.