उन्हाळ्यात जर तुम्ही माठातील पाणी पित असाल तर आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
GH News March 30, 2025 08:08 PM

उन्हाळा सुरू झाल्याने अनेकजण आता शरीराला थंडावा मिळवण्यासाठी आहारात थंड पदार्थ व पेय समाविष्ट करत असतात. अशातच उन्हाळ्यात बहुतेक लोकांना थंडगार पाणी प्यायला खुप आवडते. यासाठी बहुतेक घरांमध्ये अनेकजण उन्हाळा सुरू झाला की पाणी थंड करण्यासाठी पाण्याच्या बाटल्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यास सुरुवात करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की फ्रिजमधील थंड पाणी आरोग्यासाठी चांगले नाही. अशा परिस्थितीत, याऐवजी तुम्ही माठातले पाणी पिणे केव्हाही चांगले. यामध्ये पाणी नैसर्गिकरित्या थंड राहते. जे आरोग्यासाठी चांगले असते.

आजकाल बाजारात मातीचे माठ किंवा मातीपासून बनवलेल्या बाटल्या उपलब्ध आहेत, बहुतेक लोकं त्यांचा वापर करतात. पण मातीपासून बनवलेले हे माठ आणि बाटली वापरण्यापूर्वी तुम्ही अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, अन्यथा त्याचा तुमच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. चला तर मग आजच्या लेखातून आपण जाणून घेऊयात की माठातील पाणी पिताना कोणती काळजी घ्यावी.

माठ साफ ठेवणे

मातीपासून बनवलेले माठ वापरण्यापूर्वी ते पूर्णपणे स्वच्छ करा. मातीपासून बनवलेल्या माठामध्ये प्रक्रिये दरम्यान बॅक्टेरिया आणि घाण जमा होऊ होते त्यामुळे पाणी खराब होण्याची शक्यता असते. माठाला येणारा वास किंवा जमा असलेली घाण काढण्यासाठी चांगले धुवावे. जर तुम्ही नवीन माठ खरेदी करत असाल तर ते चांगले धुवा. यासाठी तुम्ही गरम पाणी आणि बेकिंग सोडा यांने माठ स्वच्छ धुवू शकता. जेणेकरून भांड्याच्या आतील बाजू पूर्णपणे स्वच्छ करता येतील.

माठ ठेवण्यासाठी जागेची योग्य निवड

तुम्ही जेव्हा तुमच्या घरात नवीन माठ आणून ठेवता तेव्हा ते अशा ठिकाणी ठेवा जिथे सूर्यप्रकाश त्यापर्यंत पोहोचणार नाही. कारण कडक सूर्यप्रकाश थेट माठावर पडल्यास माठ लवकर गरम होते, ज्यामुळे पाण्याची चव खराब होऊ शकते आणि पाणी कमी थंड होईल, याशिवाय माठाला तडे देखील जाऊ शकतात. त्यामुळे माठ लवकर फुटू शकते. यासाठी माठ थंड आणि हवेशीर ठिकाणी ठेवा.

माठाची देखभाल

माठाची देखभाल करणे खूप महत्वाचे आहे. वेळोवेळी भांडे स्वच्छ करा आणि त्यात कुठे भेगा पडलेल्या आहेत का किंवा तुटलेले आहे का ते पहा. जर भांडे तुटलेले किंवा भेगा पडले असेल तर ते वापरू नका कारण त्यामुळे पाणी सतत गळत राहील आणि त्याच बरोबर पाण्यात बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो.

पाणी बदलत राहा

जास्त दिवस तुम्ही जर माठात पाणी ठेवल्याने पाण्यात बॅक्टेरिया निर्माण होऊ शकतात, म्हणून माठातील पाणी वेळोवेळी बदलले पाहिजे. जर तुम्ही माठ वापरत असाल तर त्यात दररोज किंवा प्रत्येक दुसऱ्या दिवशी ताजे पाणी भरा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.