मालेगाव : जगात ख्रिश्चन व मुस्लीम राष्ट्रे आहेत. मात्र एकही हिंदू राष्ट्र नाही. भारतात हिंदू बहुसंख्य आहेत, त्यामुळे भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा. देशात समान नागरी कायदा लागू करा, अशी मागणी अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती महाराज यांनी येथे आज केल्या.
मालेगाव येथील यशश्री कंपाउंडमध्ये रविवारी (ता.३०) झालेल्या विराट हिंदू संत संमेलनात ते बोलत होते. वारकरी संप्रदायातील संग्रामबापू भंडारे, मिलिंद एकबोटे, राष्ट्रसंत मुनी नीलेशचंद्र महाराज आदी उपस्थित होते. स्वामी भारतानंद म्हणाले की, लव्ह जिहाद व लँड जिहाद विरोधात कठोर कायदे करण्याची गरज आहे. औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्यांचे उदात्तीकरण करणे हा इतिहासावर कलंकाचा प्रयत्न असून त्याची कबर काढून समुद्रात फेकून द्या.
साध्वी प्रज्ञासिंहांचा भ्रमणध्वनीद्वारे संवादप्रकृती अस्वस्थतेमुळे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर मालेगावात येऊ शकल्या नाहीत. त्यांनी उपस्थितांशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला. ‘तब्येत ठीक नसल्याने व अनुष्ठानामुळे मी येऊ शकले नाही. माझे विचार तुमच्या सोबत आहेत,’ असे त्या म्हणाल्या.