रमजान ईद देशभरात आज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. मुस्लिम बांधवांकडून रमजानचा एक महिना रोजा ठेवल्यानंतर, आजच्या दिवशी राज्यातील अनेक ठिकाणी ईद साजरी करण्यात येते. मुस्लिम बांधवांकडून रमजान ईदचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. आज पहाटे पासूनच मुस्लिम बांधवांकडून रमजान ईदच नमाज पठण करण्यात येत आहे.
मुंबईसह देशभरात ईदच्या निमित्ताने मोठा उत्साह आहे. मुंबईतील माहिम दर्गा मशिदीत नमाज पठण करण्यात आले. दिल्लीतील जामा मशिदीत मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा करण्यात आली. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ईद साजरी करण्यात येत आहे पण नमाज पठण करताना मुस्लिम बांधवांनी हातात काळ्या पट्ट्या बांधल्या होता.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने वक्फ (दुरुस्ती) विधेयकाच्या निषेधार्थ आज लोकांना काळ्या पट्ट्या बांधण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार अनेक मुस्लिम बांधवांनी हातात काळ्या पट्ट्या बांधून नमाज पठण केले.