हार्दिक पांड्याच्या कपाळावर टिळा आणि एका वर्षानंतर झळकला आनंद, रहाणेची विकेट मिळताच नाचला
GH News March 31, 2025 11:07 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे. मागच्या वर्षी रोहित शर्माकडून कर्णधारपद त्याच्याकडे सोपवलं होतं. त्यामुळे चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. नाणेफेकीपासून फिल्डिंग करताना असो की फलंदाजीवेळी हार्दिकला डिवचण्याची एकही संधी सोडली नाही. त्यामुळे हार्दिक पांड्या मागच्या पर्वात शांत शांत होता. पण टीम इंडियाने टी20 वर्ल्ड आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याचाबाबत मुंबई इंडियन्सचे नरमले आहेत. नाणेफेकीचा कौल झाला तेव्हा हार्दिक पांड्या कपाळावर टिळा लावून उतरला होता. यावेळी नाणेफेक झाली आणि कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला. हार्दिक पांड्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी चाहत्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्याचा आनंद हार्दिक पांड्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मागच्या पर्वात हे चित्र काहीसं वेगळं होतं.

दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचं कंबरडं मोडलं. दिग्गज खेळाडूंना तंबूत धाडलं. पॉवर प्लेमध्ये 4 फलंदाज बाद केले. त्यात अजिंक्य रहाणेची विकेट मिळाल्यानंतर हार्दिक पांड्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. भर मैदानात नाचत सुटला. मागच्या पर्वात हार्दिक पांड्या वानखेडेवर शांत शांत होता. मात्र यंदाच्या पर्वात खुलून खेळत असल्याचं दिसत आहे. अश्विनी कुमारच्या गोलंदाजीवर फटका मारता अजिंक्य रहाणे चुकला आणि तिलक वर्माच्या हाती झेल देऊन बसला. खरं तर हा झेल सुटला होता. पण तिलक वर्माने पकडला. त्यानंतर हार्दिक पांड्या आनंदाने नाचला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नाणेफेकीवेळी हार्दिक पांड्याचा एक वेगळाच अंदाज दिसला. त्याच्या कपाळावर टिळा होता. कुंकवाचा टिळा लावला होता. हार्दिकच्या कपाळावर टिळा पाहून चाहते अजून खूश झाले होते. हार्दिक पांड्याचा सनातनी अवतारही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चैत्र नवरात्र सुरु असल्याने त्याने टिळा लावला असावं असं अनेकांचं म्हणणं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.