धारशिव गुन्हा: चार दिवसांपूर्वी कळंबमध्ये सडलेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या मृतदेहसोबत आरोपी त्याच खोलीत दोन दिवस झोपला .मृतदेह शेजारीच बसून त्यांना जेवण केलं मात्र तीन दिवसानंतर मृतदेहाचा वास येऊ लागल्यानंतर महिलेची बॉडी घेऊन बाहेर पडल्याची धक्कादायक आणि भयावह कबुली आरोपीने दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिल्यानंतर आता कळंब हत्या प्रकरणात आरोपींनी नवीन खुलासा केल्याची माहिती आहे .कळंब येथील मृत महिला मनीषा बिडवेची हत्या अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातूनच झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे .हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींनी अटक केल्यानंतर या हत्येबाबत कबुली दिल्याचेही पोलिसांनी सांगितले . (Dharashiv)
संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनैतिक संबंध असल्याचा दाखवण्यासाठी महिलेचा वापर केला गेला का ? यावर तपासाचा भाग असल्याचे सांगत पोलिसांकडून बोलण्यास नकार देण्यात आला . कळंब हत्या प्रकरणात बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने दोन मारेकर्यांना ताब्यात घेतल्या असून रामेश्वर उर्फ राहण्या माधव भोसले आणि उस्मान गुलाब सय्यद अशी या दोघांची नावे आहेत .हत्या केल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी दिलेल्या जबाब आत समोर आलं आहे . (Kalamb Crime News)
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं कोणालाही कळू नये यासाठी बीड पोलिसांकडून संतोष देशमुख यांचे एका महिलाशी अनैतिक संबंध होते आणि त्यातून त्यांची हत्या झाली असा बनाव रचनाचा कट पोलिसांनी आखल्याचे आरोप मध्यंतरी झाले होते .दरम्यान ज्या महिलेचा संबंध या हत्या प्रकरणाशी जोडण्यात आला होता त्या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली होती .कळंब मध्ये मनीषा कारभारी बिडवे या महिलेची कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीत हत्या करण्यात आल्याचे समोर आले .दोन आरोपींना अटक झाली असून आरोपींनी हत्येची कबुलीही दिली . यातून समोर आलेल्या धक्कादायक खुलाशात हत्या करून आरोपी महिलेच्या मृतदेह सोबत त्याच खोलीत दोन दिवस झोपला अशी थरारक माहिती पोलीस सूत्रांनी दिली .मृतदेह शेजारीच बसून त्यांना जेवणही केलं मात्र तीन दिवसानंतर मृतदेहाचा वास येऊ लागल्याने महिलेची बॉडी घेऊन तो बाहेर पडला .रामेश्वर भोसले हा मृत महिला मनीषा बिडवे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा .अशी माहिती आत्तापर्यंत समोर आली होती .आता या महिलेच्या हत्येबाबत मोठा खुलासा करण्यात आलाय .या महिलेची हत्या अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे .
बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी या महिलेचा संबंध लावला जात होता . संतोष देशमुख यांचे या महिलेची अनैतिक संबंध दाखवण्यासाठी बीड पोलिसांना दाखवायचे होते म्हणून रुग्णवाहिका कळंबच्या दिशेने वळवल्याचा आरोप यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता . संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनैतिक संबंध असल्याचा दाखवण्यासाठी या महिलेचा वापर झाला का यावर बीड पोलिसांनी बोलण्यास स्पष्ट नकार दिला असून याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक करत असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक शपथ आमना यांनी सांगितला आहे .
हेही वाचा:
अधिक पाहा..