Shocking Stunt Video: रेल्वे प्रवासादरम्यान धोकादायक स्टंट करण्याचे धाडस बरेच तरुण दाखवत असतात. मात्र, त्यामुळे जीव गमावण्याचीही वेळ येऊ शकते, याचा जराही विचार अनेकजण करत नाहीत. सध्या अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण ट्रेनच्या दरवाजाला लटकत स्टंट करताना दिसत आहे. हे दृश्य पाहून कोणाच्याही काळजाचा ठोका चुकेल.
(Viral)होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला मुंबई शहरातील लोकल ट्रेन दिसून येत आहे. व्हिडिओत पुढे पाहिले तर धावत्या लोकलच्या दरवाजात एक तरुण आहे. तोच तरुण काही वेळाने धावत्या ट्रेनच्या दरवाजात उभा राहतो आणि स्टंट बाजी करण्यास सुरुवात करतो. जराही तरुणाचा तोल गेला असता किंवा बाहेर असलेल्या कोणत्याही वस्तुची त्याला धडक बसली असती तर तरुणाचा जागीच मृत्यू झाला असता. सर्व धक्कादायक प्रकार रेल्वेमधील एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केलेला आहेत.
सर्व प्रकार नक्की मुंबईमधील कुठल्या स्टेशन दरम्यानचा आहे, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''चांगलाच हाणला पाहिजे पोलिसांनी'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''मस्करी कधी जीवावर बेतेल सांगता येत नाही'' तर अशा अनेक संतापजनक प्रतिक्रिया लोकांनी केलेल्या आहेत.
सोशल मीडियावर यापूर्वीही अनेक तरुणांचे असे धोकादायक (Stunt) व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. त्यात अनेक तरुणांना स्वत:चा जीव गमवावा लागला आहे तर अनेकांनी गंभीर दुखापतही झालेली आहे. मात्र, या धक्कादायक प्रकारचा व्हिडिओ @GhandatMangal या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.