अक्कलकोट : आमदार सचिन कल्याणशेट्टी हे विकासाभिमुख नेतृत्व असून त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. सागर कल्याणशेट्टी व मित्र परिवाराने हन्नूर केसरी बैलगाडा शर्यत आयोजित करून या खेळास प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचे कौतुक करतो, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर केसरी बैलगाडा शर्यतीत प्रथम सहा क्रमांक मिळविलेल्या बैलगाडा चालक-मालक शेतकऱ्यांना पालकमंत्री गोरे व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री गोरे बोलत होते. हन्नूर केसरी बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, उपसरपंच सागर कल्याणशेट्टी, शहाजीराजे पवार, अमोल शिंदे, मिलिंद कल्याणशेट्टी, आनंद तानवडे, मोहोळचे संतोष पाटील, महेश हिंडोळे, उपसरपंच शरणप्पा हेगडे, जगन्नाथ पाटील, राहुल मोरे, राजेंद्र भरमशेट्टी, बसवराज जकिकोरे, मेघराज दुलंगे, कल्याणी शैलेश पाटील, तहसीलदार विनायक मगर, गटविकास अधिकारी शंकर कवितके, अण्णाप्पा बाराचारी, सिद्धाराम बाके, प्रदीप जगताप, शिव स्वामी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर मचाले, चनबसय्या कौटगी, सुनील कळके आदींसह असंख्य मान्यवर उपस्थित होते.
बैलगाडा शर्यत यशस्वी करण्यासाठी संयोजक सागर कल्याणशेट्टी, राम पारतनाळे, शरणाप्पा हेगडे, सिद्राम पुजारी, गौतम बाळशंकर, अनिल तळवार, गणेश सगळे, अर्जुन जळकोटे, सचिन जळकोटे, प्रवीण कोरे, भरत टिकंबरे, अमोघसिद्ध होनमाने आदींनी परिश्रम घेतले. या बैलगाडा शर्यतीत पहिले बक्षीस दोन लाख ११ हजार, द्वितीय बक्षीस एक लाख ११ हजार रुपये, तृतीय बक्षीस ५१ हजार रुपये, चौथ्या क्रमांकाचे बक्षीस ३५ हजार, पाचव्या क्रमांकाचे बक्षीस ३० हजार रुपये व सहाव्या क्रमांकाचे बक्षीस २५ हजार रुपयाचे आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षीस असलेली ही एकमेव बैलगाडा स्पर्धा आहे.
बैलगाडा स्पर्धेतील विजेतेसकाळपासून हन्नूर येथे बैलगाडा शर्यतीस प्रारंभ करण्यात आला होता. तालुक्यातील एकूण ८४ तर तालुक्याच्या बाहेरील ४२ अशा १२६ संघांनी भाग घेतला होता. बैलगाडा स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे ः प्रथम क्रमांक - बुलडाणा नव्या खांडस्कर (बारामती), द्वितीय क्रमांक - कल्लाप्पा यगप्पा पुजारी, तृतीय क्रमांक - मल्लू अण्णा सोनार (चपळगाव), चतुर्थ क्रमांक - संतोष दत्तात्रय घोडके विभागून भैरवनाथ नांदोरे, पाचवा क्रमांक ः बागडे बाबा प्रसन्न ग्रुप, सहावा क्रमांक अमोल मनुरे (हन्नूर). विजेत्यांना मानाची ढाल, रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.