Viral Video: ड्रायव्हरशिवाय धावली बस; थेट दुकानात घुसल्याचा थरारक VIDEO आला समोर
Saam TV April 02, 2025 11:45 PM

nandurbar Viral News: नवापूर बस स्थानकात बसच्या अपघाताची विचित्र घटना घडली असून, या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. नवापूर बस स्थानकात उभी असलेली एस.टी. बस अचानक अनियंत्रित होत स्थानकासमोरील दुकानांमध्ये घुसली. घडलेल्या दुर्घटनेत दोन दुकाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बसमध्ये बसलेले दोन शाळकरी विद्यार्थी जखमी झाले आहेत. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दुकान उध्वस्त, थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद

मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण घटना नंदुरबारमधील नवापूर स्थानकातील आहे. जिथे चालक बसमध्ये नसतानाच अचानक बस चालू झाली आणि बस स्थानकासमोरील दोन दुकानांमध्ये थेट घुसली, यामध्ये दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. धक्कादायक म्हणजे त्यावेळेस बसमध्ये बसलेले दोन शाळेकरी (Student)झाले जखमी.

जखमी विद्यार्थ्यांना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांकडून खोडसाळपणा झाल्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून नवापूर बस स्थानकात नेमका हा अपघात कसा घडला या संदर्भात डेपो मधील डेपो मॅनेजर आणि कंट्रोल मधील कर्मचारी काहीही बोलायला तयार नाही

सध्या संपूर्ण घटनेचा हा (Video) इन्स्टाग्राम या सोशल मीडिया या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून इन्स्टाच्या saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''बस घुसली दुकानात,मोठा अनर्थ टळला'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखोंचे व्ह्यूज मिळाले असून अनेक लाईक्स मिळालेले आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.