अक्षय शिंदे, साम टीव्ही
जालना : महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरातील्या सूनेने आपल्या सासूची हत्या केल्यानं जालन्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. सूनेने शरीराच्या वेगवेगळ्या भागात पाच ते सहावेळा चाकूने वार करून आपल्या सासूला संपवलं असून आरोपी सून आपल्या साथीदारासह फरार झाली. भोकरदन नाका परिसरामधील प्रियदर्शनी कॉलनी या परिसरामध्ये ही घटना घडली. कौटुंबिक कारणातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. सविता शिंगारे असं मयत महिलेचे नाव आहे. आता पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी सुनेला अटक केली आहे.
दरम्यान, हिने कुटुंबात होत असलेल्या किरकोळ वादातून सासूची हत्या केल्याचं उघड झालंय. शरीराच्या वेगवेगळ्या भागात पाच ते सहावेळा चाकूने वार करून सुनेने सासूला संपवलं असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. जालना पोलिसांनी आरोपी सुनेला परभणी येथून अटक करून जालन्यात आणलं आहे.
घटनाक्रम नेमका कसा?
सासू आणि सुनेचा काल मंगळवारी रात्री किरकोळ कारणावरून रात्री वाद झाला
यानंतर मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घरातच पडलेल्या एका चाकूने सुनेने सासूच्या शरीरावर वेगळ्या ठिकाणी पाच ते सहावेळा वार करून संपवलं
हत्या केल्यानंतर आरोपी सून एक तास घरात बसून राहिली, नंतर सासूचा मृतदेह एका गोणीत टाकला
मृतदेह एका गोणीत भरल्यानंतर आरोपी सुनेने पायी जालना बस स्टॅण्ड गाठलं
बस स्टॅण्डहून रिक्षा करून आरोपी जालना रेल्वे स्टेशनला पोहोचली
सकाळी सहा वाजेच्या रेल्वेने आरोपी सून परभणीला रवाना झाली
परभणी रेल्वे स्टेशनहून आरोपी सून माहेरच्या घरी पोहोचताच जालना पोलिसांनी आरोपी सुनेला ताब्यात घेतलं