यूएस शेअर मार्केट नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ लादल्यानं ट्रेड वॉर वाढण्याचं आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळं अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. या घसरणीमुळं 1.7 लाख कोटी डॉलर्सचं नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
अमेरिकन बाजार सुरु झाल्यानंतर सर्वाधिक नुकसान ज्या कंपन्यांच्या सप्लाय चेन विदेशी उत्पादकांवर निर्भर आहेत. उदा. एप्पल कंपनी अमेरिकेत विकले जाणारे फोन चीनमध्ये बनवते. त्यामुळं प्री मार्केट ट्रेडिंगमध्ये एप्पलचे शेअर गडगडले.
रॉयटर्सच्या माहितीनुसार वॉल स्ट्रीटचा प्रमुख निर्देशांक घसरला आहे. अमेरिकन प्रमाणवेळेनुसार साडे नऊ वाजता डॉव जोन्स इंडस्ट्रीयल एवरेज निर्देशांक 1111.20 टक्क्यांनी घसरुन 41103. 63 वर आला. एस अँड पी 500 निर्देशांक 188.27 अंकांनी घसरुन 5482.70 वर आला. नॅस्डॅक कम्पोझिट 789. 63 अंकांनी घसरुन 16811 वर आला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर शुल्क म्हणजेच टॅरिफची घोषणा केली आहे. अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर इतर देश जे शुल्क आकारतात तितकं शुल्क अमेरिका देखील त्या देशांवर आकारणार आहे. अमेरिकेनं भारतातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर 26 टक्के टॅरिफ आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेनं बांगलादेशवर 37 टक्के , चीनवर 54 टक्के, व्हिएतनाम 46 टक्के , थायलँडवर 36 टक्के टॅरिफ लादलं आहे. ट्रम्प यांनी जवळपास 60 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे.
सीएनबीसीच्या नुसार मल्टीनॅशनल कंपन्यांच्या शेअर मोठी घसरण पाहायला मिळाली. Nike च्या शेअर मध्ये मोठी घसरण झाली. यांचं मॅन्युफॅक्चरिंग व्हिएतनाममध्ये होतं. एप्पलचा शेअर 9 टक्के घसरला आहे. आयात वस्तूंची विक्री करणाऱ्यांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. एस अँड पी 500 ची 2022 नंतरची सर्वाधिक मोठी घसरण दिसून येते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यरात्रीच्या सुमारास जाहीर केलेल्या टॅरिफ रेट धोरणाचा परिणाम म्हणून सोने दरात सकाळपर्यंत 700 रुपयांची वाढ झाली होती. सोन्याचे दर 92000 तर जीएसटीसह 94700 इतक्या मोठ्या उंचीवर जाऊन पोहोचले आहेत. येत्या काही तासात किंवा काही दिवसात ही वाढ अजूनही होण्याची शक्यता असून सोन्याचे दर शुद्ध सोन्याच्या दहा ग्रॅम साठी 95 ते 97 हजार रुपयांच्या वर पोहोचू शकतात असा अंदाज सोने व्यावसायिक वर्तवत आहेत.
इतर बातम्या :
अधिक पाहा..