Solapur News : आधी मारहाण, मग मुंडन...चेहरा विद्रुप करण्यासाठी नवऱ्याने बायकोच्या भुवयांवरुन फिरवला ट्रिमर
Saam TV April 04, 2025 12:45 AM

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही, प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीसह तिघांनी मिळून एका विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना बार्शीमध्ये घडल्याची माहिती समोर आली आहे. पती, मेहुणा आणि नणंदेकडून मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने केले आहेत. या प्रकरणी पीडितेने बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेहुणा आणि नणंदेचे अनैतिक संबंध असल्याची माहिती पीडित महिलेने तिच्या पतीला दिली. यामुळे पीडितेच्या पतीला संताप अनावर झाला. त्याने महिलेवर अत्याचार करायला सुरुवात केली. रागाच्या भरात पिडीतेच्या पतीने तिला मारहाण केली. तसेच तिचे जबरदस्तीने मुंडन केले असे पीडित महिलेने म्हटले आहे.

रागारागात पीडित महिलेच्या पतीने तिचे केले. एवढ्यावरच न थांबता, त्याने पीडितेच्या भुवयांवरुन ट्रिमर फिरवत चेहरा विद्रुप केला. मेहुणा आणि नणंदेचे अनैतिक संबंध असल्याचे महिलेने तिच्या पतीला सांगितले होते. यावरुनच हा प्रकार घडल्याचे पीडित महिलेच्या फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.

अत्याचारानंतर पीडित महिलेने बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तिने पती, मेहुणा आणि नणंद यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांकडे मागणी केली. तिच्या तक्रारीनंतर तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.