लोकसभेत वक्फ विधेयक पास झाल्यानंतर ते आत्ता राज्यसभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे.
राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असून सभागृहाची सदस्य संख्या 250 आहे. मात्र,सध्या सभागृहात 236 सदस्य आहेत.
या सभागृहात वक्फ सुधारणा विधेयकाच्या मंजुरीसाठी 119 खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.
लोकसभेप्रमाणे राज्यसभेत देखील भाजप सर्वात मोठा पक्ष असून भाजपचे 98 खासदार आहेत.
भाजपकडे 98 सदस्य आहेत तर संयुक्त जनता दल, तेलुगू देशम पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व इतर लहान पक्षांचे समर्थन मिळून भाजपच्या मित्रपक्षांच्या खासदारांची संख्या 27 आहे.
राज्यसभेत काँग्रेसचे 27 सदस्य आहेत.
विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसनंतर तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) 13 सदस्य आहेत.
आम आदमी पक्षाचे 10, डीएमकेचे 10, वाईएसआरसीपीचे 7 और आरजेडीचे 5, समाजवादी पक्षाचे 4 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन सदस्य राज्यसभेत आहेत.