जेष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचं शुक्रवारी (ता.04) वयाच्या 87 व्या वर्षी निधन झालं.
देशभक्तीपर चित्रपटांसाठी तसंच 'भारत कुमार' या टोपणनावासाठी ते ओळखले जायचे.
मनोज कुमार यांनी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
त्यांनी आपल्या चित्रपटांमधून लोकांना देशभक्तीचा संदेश दिला. ते हिंदी चित्रपटांमध्ये देशभक्त अभिनेत्याचा चेहरा म्हणून ओळखले जायचे.
मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
PM मोदींनी मनोज कुमार यांच्यासोबतचे फोटो ट्विट करत जुन्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पन केली.
यावेळी मोदींनी लिहिलं, ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झालं आहे.
मनोजजी हे भारतीय चित्रपटसृष्टीचे एक आदर्श होते. त्यांना देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या चित्रपटांसाठी स्मरणात ठेवले जाते.
त्यांच्या कामाने राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत केली. ती अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल. या दुःखाच्या क्षणी मी त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे, अशी शब्दात मोदींनी श्रद्धांजली वाहिली.