चिकन्कारी फॅशन: सर्व वेळ उष्णता-मिस्टेक
Marathi April 04, 2025 10:24 AM

उन्हाळा सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत, महिलांना कायम कम्फर्टेबल कपडे घालावे असे वाटत असते. खरंतर कोणत्याही परिस्थितीत महिला स्टायलिश लूक मिळवण्यासाठी धडपड करत असतात. या उन्हाळ्याच्या दिवसात सैलसर आणि कम्फर्टेबल आउटफिट ऑप्शन म्हणून चिकनकारी कॉटन कुर्तीज हा बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. जे दिसायला खूप आकर्षक दिसतात. याने छान लूकही मिळतो. विशेषतः जर ते योग्यरित्या स्टाईल केले असेल तर तुमचा लूक आणखी चांगला दिसू शकतो. आज आपण जाणून घेऊयात चिकनकारी कुर्तींविषयी.

फिटिंग योग्य असावी.

जर तुम्हाला चिकनकारी कुर्ती घ्यायची असेल तर तिच्या फिटिंगची विशेष काळजी घ्या. जर तुमची चिकनकारी कुर्ती सैल किंवा घट्ट असेल तर ती तुमचा लूक खराब करू शकते. अशा परिस्थितीत, योग्य फिटिंग केल्यानंतरच तुमची कुर्ती घाला.

जीन्ससोबत दिसेल सुंदर

जर तुम्हाला ऑफिसमध्ये चिकनकारी कुर्ती घालायची असेल तर तुम्ही त्यासोबत जीन्स घालू शकता. जीन्ससोबत कुर्ती घातल्याने तुम्ही खूप गोंडस दिसाल. विशेषतः जर तुम्हाला फॉर्मल लूक द्यायचा असेल तर तुम्ही जीन्ससोबत चिकनकारी कुर्ती कॅरी करू शकता.

पलाझोसोबत दिसेल सुंदर

जर तुम्हाला जीन्स कम्फर्टेबल वाटत नसेल आणि ट्रेडिशनल लूक हवा असेल तर पलाझोचा पर्याय निवडू शकता. जर तुम्ही पलाझोसोबत चिकनकारी कुर्ती घातली तर ती परिधान केल्याने तुमचा लूक पूर्णपणे एथनिक दिसेल.

हलके रंग निवडा

चिकनकारी कुर्ती खरेदी करताना, ती नेहमी हलक्या रंगाची असायला हवी हे लक्षात ठेवा. हलक्या रंगाची चिकनकारी कुर्ती तुम्हाला उन्हाळ्यात कम्फर्टेबल राहण्यास मदत करेल आणि ती घातल्यावर तुम्हाला गरमही वाटणार नाही.

असे दागिने घाला

चिकनकारी कुर्तीसोबत नेहमी ऑक्सिडाइज्ड दागिने घाला, कारण चिकनकारी कुर्तीचा रंग खूप हलका असतो. अशा परिस्थितीत, तुम्ही ऑक्सिडाइज्ड दागिने घालून तुमचा लूक कम्प्लीट करू शकता.

चिकनकारी कुर्तीसोबत पादत्राणे अशी असावी

जर तुम्ही स्किन टाइट जीन्स घालत असाल तर हील्स घाला. जर तुम्ही रुंद पायांची जीन्स घातली असेल तर तुम्ही शूज कॅरी करू शकता. जर तुम्ही पलाझो घालत असाल तर फ्लॅट्स घाला, जेणेकरून तुमचा लूक चांगला दिसेल.

हेही वाचा : Ram Navami 2025 : रामनवमीला चुकूनही करू नयेत ही कामे


संपादित – तनवी गुडे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.