बीड : आरोपी सतीश ऊर्फ खोक्या भोसलेला वन विभागाच्या कोठडीत मारहाण झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. खोक्या भोसलेला वन विभागाच्या ताब्यात असताना मारहाण झाली नसल्याचं विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. वन विभागाच्या ताब्यात असताना सतीश भोसलेला मारहाण झालीच नाही, असं निरीक्षण वैद्यकीय अहवालानंतर न्यायालयानं निरीक्षण नोंदवलं आहे. त्यामुळं सतीश भोसलेने दाखल केलेला अर्ज रद्द करण्यात आल्याची माहिती वन विभागानं दिली आहे. खोक्या भोसलेच्या वकिलांकडून मात्र मारहाण झाल्याचा दावा कायम आहे.
वनविभागाच्या ताब्यात असताना सतीश भोसलेला मारहाण झाली नाही… त्याच्या अंगावर कोणत्याही नवीन जखमेचे व्रण नाहीत असा अहवाल वैद्यकीय अधिकार्यांनी दिला होता.. त्यानुसार न्यायालयाने देखील सतीश भोसलेने दिलेली तक्रार नाकारल्याचे समोर आले आहे. याबाबत वनविभागाने अधिकृत खुलासा केला आहे.
बीड वन विभागाने आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले याला कारागृहातून ताब्यात घेतले होते. यादरम्यान वन विभागाच्या अधिकार्यांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार सतीश भोसलेने न्यायालयासमोर केली होती. त्यानुसार न्यायालयाने वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले होते. या तपासणीत सतीश भोसलेच्या अंगावर कोणत्याही नवीन जखमेचे व्रण नसल्याचा अहवाल दिल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, सतीश भोसलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानं वन विभागानं सतीश भोसलेला रात्री साडे दहा वाजता पुन्हा जिल्हा मध्यवर्ती कारागृह यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती दिली.
यामुळे सतीश भोसलेने नेमकी तक्रार का केली होती? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे सतीश भोसले याचे वकील अंकुश कांबळे यांनी मात्र सीसीटीव्ही बंद करत सतीश भोसले याला मारहाण झाल्याचा दावा केला आहे.
सतीश भोसले यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासासाठी ताब्यात घेतलं. पाटोदा येथील ऑफिसमध्ये नेल्यानंतर सतीश भोसलेची चौकशी करण्यात आली. अमोल नावाच्या अधिकाऱ्यानं सर्वांना बाहेर काढलं, सीसीटीव्ही बंद करुन सतीश भोसलेला अमानूष मारहाण केली. घरच्यांना देखील त्रास देऊ अशी धमकी देण्यात आली. दरम्यानस सतीश भोसले उर्फ खोक्याचे वकील अंकुश कांबळे यांनी याबाबत न्यायालयात लढा देणार असल्याचं म्हटलं.
<एक href ="https://marathi.tezzbuzz.com/news/maharashtra/agriculture-minister-manikraoo-kokate-questions-farmers-on-loan-Wiver-insue-in-nashik-1352726">कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? कृषीमंत्र्यांचा शेतकऱ्यांना सवाल
<एक href ="https://marathi.tezzbuzz.com/news/maharashtra/karnataka-rakshasa--wedike-supports-mns-stance-on-Marathi-language-1352720">मोठी बातमी : कर्नाटक रक्षण वेदिकेचा मनसेला पाठिंबा, बँका आणि अन्य आस्थापनांमध्ये त्या त्या राज्यातील भाषा बोलण्याचं समर्थन!